Finance म्हणजेकाय ? Finance information in Marathi

 Finance म्हणजे काय? (Finance information in Marathi)

Finance  म्हणजे काय?  Finance कशाला म्हणायचं ? फायनान्स मुळे काय होतं ? Finance या शब्दाचा नेमका अर्थ काय ?

   हे बराच लोकांना माहीत नसतात.  Finance शब्द आपण रोजच्या घडामोडी मध्ये सतत वापरत असतो. परंतु मुळात Finance म्हणजे काय ?  Finance चा वापर काय ? Finance चे प्रकार कोणते ? (type of Finance ) हे आपल्याला माहीत नसतं.  खरं सांगायचं म्हणलं तर Finance. हे आजच्या युगामध्ये खूप महत्त्वाचे आहे . खूप लहानपणापासून फायनान्स चा विचार आजच्या युगामध्ये केला जातो.  ज्यांना वयाच्या 30 वर्षी करोडपती होण्याचे स्वप्न असते . त्यासाठी Finance हे खूप लहानपणापासून महत्त्वाचे  आहे .

Finance हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये विविध गोष्टी आले असतील.  जसं की गुंतवणूक,  शेअर मार्केट, कर्ज(loan) ,(Bank) , व्याज (Interest) ,  लेखा इत्यादी सर्व विषयाबद्दल.  Finance मध्ये बोलला जातो. Finance हे खूप मोठी संकल्पना आहे . सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर Finance म्हणजे आपले व्यवहार किंवा आपल्या कंपनीचे  आर्थिक व्यवहार , आपण कमावलेले पैसे आपण कशाप्रकारे वापरायचे कुठे आणि कशा प्रकारे गुंतवायचे .

 आपण खर्च कुठे करतो , आपण खर्च कुठे करत नाहीत,  आणि आपण पैसा किती आणि कशासाठी साठवतो , याची व्यवस्था करणे कर्ज देणे, , कर्ज घेणे इतकेच नव्हे तर हिशोब करणे ,,आर्थिक नियोजन आणि विश्लेषण करणे हा सगळा जो पैशाचा देवाणघेवाण व्यवहार आहे. म्हणजेच पैसे कमवल्यापासून ते खर्च होईपर्यंत जो काही पैशाचा व्यवहार आणि त्याचे नियोजन आणि त्याचे व्यवस्थापन जे काही केलं जातं त्याला सोप्या भाषेमध्ये Finance असं म्हटलं जातं.

 Finance meaning in Marathi :-

finance meaning in Marathi ? हा प्रश्न दैनंदिन जीवनामध्ये सर्वांना पडतो. 2022- 23 या वर्षांमध्ये finance कडे खूप लोकांचे विचार वळले आहेत.  त्यामुळे finance  नेमकं काय असतं.  हे या पोस्टमध्ये तुम्हाला समजेल खूप सरळ सोप्या भाषेमध्ये आपण फायनान्स चे नियोजन कसे करू शकतो हे या पोस्टमध्ये तुम्हाला समजेल.

Information about finance in Marathi (about finance in Marathi).

आपण लहानपणी पाहिला आहे.  सर्व इंग्लिश शब्द हे Latin आणि French या भाषेपासून तयार केले  आहेत. तसाच finance  शब्द सुद्धा french भाषेपासून घेतलेला आहे. finance या शब्दाला मुळात मराठी भाषेमध्ये वित्त पैसा असं बोललं जातं .

Finance, म्हणजे वित्त असं होतं. आपण जेव्हा फायनान्सचा विचार करतो , तेव्हा आपल्यासमोर finance संदर्भात खूप सारे शब्द येतात . जसे की Finance Department , Personal Finance ,Finance  Job, Finance Advance , finance Minister .असे खूप सारे शब्द येतात .

 या शब्दापासून आपल्याला एवढे तर समजत आहे, की finance म्हणजे काहीतरी पैशाची देवाण-घेवाण करणे आहे .पैशाची व्यवस्था करणे म्हणजेच finance.

तुम्हाला लहानपणी आठवत असेल .तुमच्या घरातील आई ,.बाबा हे पैशाचे नियोजन करत असतील. जसं की आई घरामध्ये महिन्याचा हिशोब करत असते  . घरामधील छोट्या छोट्या गोष्टींना पैसे किती लागतात . आपले पैसे कुठे Invest  होतात . किती खर्च होतात . आपण कुठे खर्च केला पाहिजे , कुठे  Investment केली नाही पाहिजे , कुठे Saving  होईल या सर्वाचं महिन्याचं नियोजन आई महिना सुरुवातीलाच करते.  हे नियोजन म्हणजेच स्मॉल स्केलवरचा finance झालं ना .

ह्या finance मधील एकदम सरळ आणि सोप्या आणि एकदम सुरुवातीच्या बाजू आहेत.  हे झालं आईचा फायनान्स. आता उदाहरणार्थ आपले बाबा जे त्यांना पगार मिळाल्यानंतर त्यांच्या महिन्याभराचं नियोजन करतात. जसे की घरचा खर्च असेल,  बाहेरच असेल .

लोन असेल किंवा उरलेल्या पैशाचं Investment असेल जेणेकरून आपल्याला त्यातून लाभ होईल.  अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरी छोट्या मोठ्या पद्धतीने finance असतात. त्यामुळे फायनान्स जाणून घेणे हे काही मोठे रॉकेट सायन्स नाहीये. परंतु आपण इन्वेस्ट करतोय म्हणजे आपल्याला लाभ झाला पाहिजे . हे जाणून घेणे व आपल्या बुद्धीने कुठे इन्व्हेस्ट करायचे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Finance काय आहे ? (Finance meaning in Marathi):-

जसे की मी तुम्हाला या आधीच सांगितले जर कोणी व्यक्ती आपल्या वयाच्या 30 ते 35 व्या वर्षी करोडपती होण्याचे स्वप्न रंगवत असेल,  तर त्यासाठी finance हा शब्द खूप महत्त्वाचा आहे.  तुम्ही जर finance Information In Marathi  हा शब्द कुठल्याही Online Website ला टाकला .

 म्हणजेच Googal वरती किंवा You Tube वरती Search  केला तर याचा अर्थ , असा होतो की तुम्हाला finance बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे . finance बद्दल जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे . तुम्ही finance  बद्दल जेवढा लवकर जाणून घेणार , तेवढे आपल्यासाठी चांगले आहे . कारण आत्ता Life खूप फास्ट पळत आहे.  त्यामुळे पैशाची गरज ही पहिल्यापेक्षा जास्त आत्ता भाजत आहे.

दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्ही विचार करत असाल ,तर तुम्हाला समजेल की काही वर्षांपूर्वीच जा पैशाला एवढी किंमत होती , तेच पैसे आता साधा महिन्याभर सुद्धा पुरत नाहीत .त्यामुळे आजकालचे Expenses खूप वाढले आहेत . जसे की पहिलं तुम्ही थोड्या पैसा मध्ये पूर्ण महिना काढू शकत होता.  परंतु आता पूर्ण महिना भागवण्यासाठी पहिल्याच्या तुलनेमध्ये खूप पैसे लागतात.

आता साधं मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा लाखावरती पैसे मोजावे लागतात .तुम्ही साधे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर चार वर्षासाठी तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा लाख मोजावे लागतात . त्या उलट तुम्ही डॉक्टर Medical साठी ऍडमिशन घेतले तर,  नाही म्हटलं तर तुम्हाला एक ते दीड करोड रुपये हे तुमचं मेडिकल पूर्ण होईपर्यंत मोजावे लागतात.  यासाठीच आजच्या जीवनामध्ये finance  हे खूप महत्त्वाचे आहे.

चला तर मग जाणून घेऊया फायनान्स किती ( Type of the Finance)

आपण जेव्हा कुठल्याही कामासाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी कंपनीसाठी पैशाची व्यवस्था करतो.  याला वित्तयान म्हणजेच Finacing असे म्हटले जाते . आणि या Finacing ची परतफेड करण्यासाठी आपल्याला व्याज स्वरूपात काही पैसे परतफेड करावी लागतात . यालाच आपण  Interest असे सुद्धा बोलतो याच पैशाच्या देवाणघेवाणीला Finacing असे म्हणतात.

Finance चा Accounting आणि Economic ची खूप जवळचा संबंध आहे . अकाउंटिंग केल्यानंतर आपले पैसे किती प्रमाणात आणि कुठे खर्च होत आहेत, आपल्याला फायदा कुठे होत आहे आणि तोटा कुठे होत आहे .हे आपल्याला समजतं.

इकॉनॉमिक्स बद्दल बोलायचं झालं तर इकॉनॉमिक्स समजून घेतल्यानंतर व शिकल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला Demand आणि Suppaly म्हणजेच मागणी आणि पुरवठा याबद्दल माहिती मिळते. अर्थात कुठल्याही कंपनीचे म्हणजेच कुठल्याही व्यवसायाची काम हे डिमांड आणि सप्लाय म्हणजेच मागणी आणि पुरवठा यावर चालते.

 यामुळे आपल्याला हे लक्षात येते की बाजारामध्ये काय परिस्थिती आहे.  आपल्याला कुठे गुंतवणूक केल्यानंतर धोका आहे किंवा कुठे गुंतवणूक केल्यानंतर फायदा आहे . हे आपल्याला इकॉनॉमिक्स मुळे कळतं आणि ही माहिती जाणून घेणे हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. ही माहिती आपल्याला आपली गुंतवणूक करताना खूप उपयोगाची पडते.

Finance चे प्रकार (type of the finance):-

Finance information in Marathi or( type of the finance ) या आर्टिकल मध्ये आपण Finance चे प्रकार कोणते आहेत . त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मुळात Finance तीन प्रकार आहेत Finance हे तीन प्रकार यामध्ये विभाजित केले आहे. ते तीन प्रकार पुढील प्रमाणे.

  1. वैयक्तिक वित्त    (Personal finance  )
  2. निगम वित्त   ( Corporate finance )
  3. लोक वित्त     ( Public finance )

वैयक्तिक फायनान्स  ( Personal finance ) 

वैयक्तिक Finance  जसे की त्याच्या नावामध्येच लिहिलेला आहे. जसं की स्वतःच्या आयुष्यात स्वतःसाठी केली जाणारी आर्थिक व्यवस्था आणि नियोजन म्हणजेच वैयक्तिक वित्त  Personal finance  . आपण  पैसा कमवल्यापासून  ते खर्च होईपर्यंत दैनंदिन जीवनात पैशाचा जो काही व्यवहार होतो , त्यालाच आपण पर्सनल फायनान्स (Personal finance  )असं सुद्धा बोलला जातो.

आपण दिवसभर काम करून जो काही पैसा कमवतो , तो आपण आपल्या परिवारासाठी व त्यांच्या घरचा गरजा पूर्ण करण्यासाठी कमावतो , त्यासाठी आपण Job करतो साईड बाय साईड काही  Business  करतो . त्यांनी काय होतं की आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण होतात.  परंतु एवढं सगळं करून,  जर आपल्या गरजा पूर्ण होत नसतील. तर आपण लोन काढतो , या लोन साठी सोबतच आपण त्याचे EMI ,Loan, Tax, Interest.

 यासोबत इतर काही ठिकाणी पैसे इन्वेस्ट करतो, ते सर्व आपल्याला बघावे लागते. या सर्व गोष्टी सांभाळून Manage करून आपल्या पैशाचे व्यवहार करतो . आपल्या घरामध्ये जर आपले वडील एकटेच पैसे कमवत असतील तर ते घराचे पूर्ण निर्णय घेतात .  जसे की पैसा कुठे गुंतवायचा किती खर्च करायचा या गोष्टीलाच Personal Finance  (वित्त ) म्हणजेच पर्सनल फायनान्स असे बोलतात.

सार्वजनिक वित्त  (Public Finance):-

Public Finance  किंवा सार्वजनिक वित्त या शब्दाचा अर्थ सुद्धा या शब्दांमध्येच दडलेला आहे . पब्लिक म्हणजेच खूप सारी जनता म्हणजेच सरकारकडून देश व जनतेसाठी केलेली आर्थिक व्यवस्था म्हणजेच Public Finance .

आपल्या देशामध्ये पब्लिक फायनान्स ( लोक वित्त ) म्हंटलं की सरळ सरळ या शब्दाचा संबंध हा आपल्या सरकारशी म्हणजेच Government  सोबत जोडला जातो.  जसं पर्सनल फायनान्स मध्ये घर चालवण्यासाठी घरातल्या प्रमुखाला घराचे पूर्ण नियोजन व आर्थिक नियोजन करावे लागते.

 तसेच देश चालवण्यासाठी पूर्ण जनतेला सांभाळण्यासाठी सरकारला सुद्धा देशासाठी काम करावे लागते.  या काम करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते . देश चालवण्यासाठी व त्याच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण पैसा खर्च करतो . यालाच लोक वित्त किंवा सार्वजनिक वित्त असेही बोलले जाते.

सरकार पैसा कसा खर्च करतो किंवा सरकारकडे पैसा कोठून येत.  Government Tax, Collection आणि दुसऱ्या खूप सार्‍या माध्यमातून जनतेकडूनच पैसा घेत असते.  देशात एखादे काम करण्यासाठी आधीच त्याचे बजेट तयार केले जाते .

या पैशांमधून सरकारला देशा कशाचा विकास करावा लागतो . जसे की देशामध्ये रोड ,कन्स्ट्रक्शन , कंपनीज जनतेला विकसित करण्यासाठी अधिक  माध्यमे जसे की स्कूल , हॉस्पिटल यासाठी आधीच सरकार बजेट तयार करून ठेवतो आणि या बजेट मधूनच देश विकसित होतो व देश चालवला जातो यालाच आपण Public Finace  बोलतो.

फक्त जनतेकडूनच टॅक्स किंवा दुसऱ्या माध्यमातून पैसे न घेता सरकार फायनस मिनिस्ट्री आपले फायनान्स मॅनेज करतात ्यासाठी खूप सार्‍या फायनान्स कंपन्याकडून त्या मदत घेतात मोठ्या फायनान्स कंपन्या ह्या सरकारला फायनस मॅनेज करण्यासाठी मदत सुद्धा करतात.

निगम वित्त  (Corporate finance )

निगम वित्त म्हणजेच कॉर्पोरेट वित्त (Corporate finance )  Finance याचा अर्थ असा होतो की कंपन्या आपल्या व्यवसायास च्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक आर्थिक व्यवस्था आर्थिक नियोजन म्हणजेच निगम वित्त.

व्यावसायिक कंपन्या आपल्या कंपनीसाठी खूप काही निर्णय घेतात.  त्यांच्या प्रगतीसाठी जसं की कंपन्यांमध्ये काही करार करणे , जमीन विकत घेणे,  शेअर होल्डर ना रक्कम देणारे साठीचे निर्णय , कर्मचाऱ्यांच्या पगारी बद्दलचे निर्णय आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी विस्तारासाठी जे काही निर्णय घेतले जातात हे सर्व निर्णय कॉर्पोरेशन फायनान्स मध्ये येतात.

जसं की वरच्या दोन फायनान्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पर्सनल फायनान्स मध्ये आपल्या स्वतःच्या घरचा भागवण्यासाठी जे काही नियोजन केले जाते ते पर्सनल Finance  झाले व पब्लिक फायनान्स मराठी मध्ये गव्हर्मेंट ने आपल्या देशासाठी आपल्या जनतेसाठी केलेले नियोजन म्हणजेच पब्लिक फायनल झाला . तसेच कंपन्यांनी आपल्या कंपनीच्या प्रगतीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी विकासासाठी केलेले पैशाचे नियोजन म्हणजेच कॉर्पोरेशन फायनान्स म्हणजेच निगम वित्त होय.

तुम्हाला माहीतच आहे आपण कुठल्याही काम करताना सर्वात पहिलं त्यासाठी लागणाऱ्या पैशाची प्लॅनिंग करतो.  तसंच एखादी कॉर्पोरेट फायनान्स कंपनी आपली कोणतेही ऑर्गनायझेशन टाकत असताना सर्वात पहिलं Finance   प्लॅनिंग म्हणजेच पैशाचे नियोजन करते त्यासाठी लागणारी गुंतवणूक ही करतात कंपनी ऑर्गनायझेशन करताना सर्वात पहिलं कंपनीसाठी लागणारा पैसा हे कोणत्या ठिकाणाहून भेटेल याचे कंपनी नियोजन करते .

त्यानंतर त्या पैशांना योग्य त्या मार्गाने चांगले ठिकाणी इन्व्हेस्ट करतात . .त्यातून योग्य प्रॉडक्ट जो त्यांना लाभ देईल असा तयार करतात  .हे सर्व काही त्या कंपनीच्या मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन मधील मेंबर एकमेकांसोबत करतात हे सर्व कंपनीसाठी उपयुक्त निर्णय हे कंपनीचे मॅनेजमेंट आणि तिथले मेंबर घेत असतात या प्रकारचे निर्णय कंपनीसाठी घेणे म्हणजेच कॉर्पोरेट फायनान्स.

फायनान्शियल नॉलेज का आवश्यकता आहे ? (  finance knowledge in Marathi why we need finance knowledge )

Finance क्षेत्रामध्ये आपलं नॉलेज हे आवश्यक आहे.  कारण फायनान्स क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात Scope आहे.  कारण आज कालचा दैनंदिन परिस्थितीमध्ये आपल्याला समजत आहेच कुठल्याही प्रकारचा व्यवसाय हे कमी जास्त होऊ शकतो परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक व्यवस्था असते.

 प्रत्येक क्षेत्र व्यवसाय पूर्ण देश हा आर्थिक व्यवस्थेवर चालतो . त्यामुळे आपण जर का Finance  क्षेत्रामध्ये आपलं भविष्य (carrer) बघत असाल तर ते खूप जास्त प्रगतशील आणि उत्तम क्षेत्र आहे . कारण आपल्या देशांमध्ये जगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये उतार चढाव येथील परंतु फायनल क्षेत्र हे सतत पुढे जात राहील.

वरी सांगितलेल्या माहितीप्रमाणे Finance  हे आपल्याला आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत .तसेच  Finace  हे आपल्या रोजच्या जीवनासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे . कारण आपल्याला त्यामध्ये करिअर करायचे असं किंवा नसो परंतु आपल्या पैशाचे नियोजन करण्यासाठी Finace   आपल्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

कोणतीही व्यक्ती आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जर Finacial  स्टेबल बनायचे असेल , तर तिला तिच्या जीवनामध्ये Finacial  नॉलेज घेणे हे खूप गरजेचे आहे . आपल्या सभोवताली असे खूप सारे लोक आहेत ज्यांची Monthly Income ( महिन्याचा पगार ) लाखो मध्ये आहे .

आज-काल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुळे महिन्याला लाखो रुपये लोक कमवतात . परंतु Finace   शेअर नॉलेज नसल्यामुळे ते पैसे ना कुठे गुंतवणूक करायचं हे सांगू शकत नाही . त्यामुळे त्यांना तोटा होतो त्यामुळे आपल्याला Finacial Knowlage असणे खूप गरजेचे आहे.

Classification of finance:-

आजच्या परिस्थितीमध्ये आपण एखादी वस्तू छोटी असेल किंवा मोठी आपण ऑनलाईन वेबसाईटवरून ती विकत घेऊ शकतो.  उदाहरणार्थ आपण Google, Amazon ,Flipcard , Meesho, Myntra ,Snapdeel अशा कित्येक वेबसाईटवरून खूप सारे ऑनलाइन वस्तू घेऊ शकतो.

 जसे की आपल्याला जर मोबाईल विकत घ्यायचा असेल,  आणि तुमच्याकडे तो मोबाईल घेण्यासाठी पैसे नसतील तरीसुद्धा तुम्ही या ऑनलाइन वेबसाईटवरून मोबाईल विकत घेऊ शकतो .आपल्याला थोड्या काळासाठी वस्तू घेण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या Finace  करतात .

 आपल्याकडे पैसे नसताना देखील या फायनान्स मुळे आपल्याला आपले हवी ती वस्तू विकत घेऊ शकतो.जर तुम्ही फायनान्स करून एखादी वस्तू विकत घेत असाल , तर आपण ती लोन अमाऊंट कमीत कमी ती 3   ते 6  महिन्यांमध्ये फायनान्स कंपनीला  वापस करू शकतो.

 तरी या कंपन्या तुम्हाला झिरो पर्सेंट व्याजदरावर फायनान्स करण्यासाठी सवलत देतात . पण तुमच्याकडून जर या कालावधीमध्ये वाढ झाली म्हणजे तीन ते सहा महिन्याच्या ऐवजी यापुढे जर तुम्ही ते पैसे कंपनीला परत करू शकत नसाल तर तुम्हाला फायनान्स कंपनी अमाऊंटवर व्याजदर देण्यास भाग पाडते . याप्रमाणे वेळेचा स्वरूपामध्ये Finace  चे क्लासिफिकेशन कसे केले आहे हे खालील प्रमाणे.

शॉर्ट टर्म फायनान्स(Short Term Finance)

जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकत घेण्यासाठी कमी कालावधी मध्ये Finace   कडून लोन घेत असाल,  म्हणजेच तुम्ही एखादी वस्तू विकत घेण्यासाठी Finace  कडून कमीत कमी 15 महिने साठी लोन घेत असाल, तर ते लोन शॉट फायनान्स (short Term Finance ) मध्ये मोडले जाते.

मिड लेवल फायनान्स ( MidLeval Finance )

मिडीयम लेवल फायनान्स चा कालावधी पंधरा महिने ते पाच वर्षापर्यंत असतो . या मिड लेवल फायनान्सचा वापर करून एखादी ऑर्गनायझेशन स्टार्टअप कंपनी टाकून आपले प्रॉडक्ट जनरेट करू शकते. फायनान्स हे मिड लेवल मिडीयम टाईम साठी दिले जाते.

लॉंग टर्म फायनान्स  (Long Term Finance )

लॉंग टर्म फायनान्स हा विचार डोक्यात आला की आपल्याला समजून येईल , की लॉंग टर्म फायनान्स ची अमाऊंट मोठी असेल आणि त्याचा कालावधी सुद्धा खूप मोठा असेल.  लॉंग टर्म फायनान्स मध्ये पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी लोन दिले जाते.

अशा फायनान्सला लॉंग टर्म फायनान्स असे म्हणतात , लॉंग टर्म फायनान्स  उपयोग करून आपण एखादी कंपनी तयार करू शकतो .सर्वसामान्य लोक लॉंग टर्म फायनान्स घेऊन आपल्या स्वतःच्या घरासाठी इन्वेस्ट करतात.

फायनान्स चे फायदे  ( Benefits of Finance )

Finance  चे खूप सारे फायदे आहेत . त्यापैकी काही फायदे म्हणजे जर तुमच्याकडे  काहीही पैसे नसताना तुम्ही कोणत्याही प्रकारची वस्तू घेऊ शकता.  यासाठी फायनान्स तुम्हाला मदत करतो.

जर तुम्ही कोणत्याही मेडिकल इमर्जन्सी ( Medical Finance )  मध्ये असाल .त्यावेळेस तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसेल , अशा वेळेस आपण फायनान्स कंपनीकडून मेडिकल इमर्जन्सी लोन घेऊ शकतो . या वेळेस फायनान्स कंपनी इन्स्टंट लोन अप्रो करते (Instance Loan approval) .

तुम्हाला एखादा स्टार्टअप बिजनेस करायचा असेल तर फायनान्स कंपनी तुम्हाला फायनान्स करते हा खूप मोठा फायनान्स कंपनीचा फायदा आहे कारण स्टार्टअप साठी आपल्याला खूप सारा पैसा लागतो व ते पैसा फायनान्स कंपनी आपल्याला देतो.

जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करायचा असेल , तेव्हा तुम्हाला फायनान्स कंपनी ही कमी टक्के व्याजदर लोन अप्रूव्ह करून देते.

फायनान्स मुळे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी व इतर शैक्षणिक खर्चासाठी Finance  कंपनीकडून फायनान्स करू शकता हा सुद्धा फायनान्स कंपनीचा खूप मोठा फायदा आहे.

फायनान्स चे नुकसान  ( Disadvantage of finance )

कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात , जसे Finance चे खूप सारे फायदे आहेत.  तसेच फायनान्सचे काही नुकसान सुद्धा आहेत तसाच नुकसान सुद्धा होतो . त्यामुळे फायनान्स मध्ये इन्व्हेस्ट करताना फायनान्स घेत असताना थोडी काळजी घ्यावी.

मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी फायनान्स घेता तेव्हा तुम्हाला स्टार्टिंग ला झिरो पर्सेंट (0%)  या व्याजदराने वस्तू घेण्यासाठी पैसा फायनान्स देतो . पण तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही अमाऊंट त्या फायनान्स ला कंपनीला परत करावा लागतो त्यावर इंटरेस्ट सुद्धा लागला जातो.

मित्रांनो जर तुम्ही फायनान्स कंपनीकडून काही कारणास्तव फायनान्स घेतले असेल तर तुमचा बिजनेस किंवा नोकरी तुमच्या हातातून गेली असेल तेव्हा तुमच्याकडे फायनान्स ला परतफेड करण्यासाठी रक्कम नसेल त्यावेळेस तुम्हाला फायनान्स खूप मोठ्या अडचणी निर्माण करू शकतो त्यामुळे तुमचा सिबिल खराब होतो.

Finance कंपनीचा खूप मोठे नुकसान तोटा म्हणजे जर तुम्ही फायनान्स कंपनीकडून एखादे Finance  घेतले. आणि त्या Finance सी परतफेड करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये काही कालावधीमध्ये तो Finance कंपनीला परतफेड करावा लागतो.

 जर तुम्हाला त्या परतफेड करण्यासाठी त्या तारखेच्या पेक्षा जास्त कालावधी लागत असेल.  तर फायनान्स कंपनी तुमच्याकडून चार्ज घेते . याला लेट चार्ज सुद्धा म्हणतात या सोबतच तुमचा सिबिल  (Cibil)   सुद्धा खराब होतो.

सर्वसामान्य व्यक्ती Finance  कंपनीकडून आपण आपल्याला स्वतःसाठी घर घेण्यासाठी प्रॉपर्टी घेण्यासाठी फायनान्स घेते . याला होम लोन सुद्धा बोलतात.  या लोन साठी फायनान्स कंपनी तुमच्याकडून ठराविक काळामध्ये लोन परतफेड करण्यासाठी कागदपत्रे घेतात . सोबतच तुम्ही हे लोन परतफेड करण्यासाठी असमर्थ राहत असाल,  किंवा तुम्ही त्यांचे लोन मंथली टाईम वर परत करत नसाल तर फायनान्स कंपनी तुमची प्रॉपर्टी विकून त्यांचे लोन फायनान्स परत घेऊ शकतो.

मित्रांनो मी अशी आशा करते की तुम्हाला माझ्या आर्टिकल मधून थोड्या प्रमाणात का होईना , फायनान्स काय आहे?  फायनान्स मिनिंग इन मराठी  (Finance Mining In Marathi ),   फायनान्स बेनिफिट्स ( Finance Benefit ),   इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्स (Importance Of Finance ),   टाइप ऑफ फायनान्स ( type Of Finance ) आशा पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.

Leave a Comment