Saving Account Meaning In Marathi सेविंग अकाउंट म्हणजे काय तुमच्यासाठी कोणते खाते फायदेशीर असेल सेविंग अकाउंट चे सहा प्रकार.
बँक मध्ये वेगवेगळ्या खात्याबद्दल माहिती दिलेली असते. परंतु आपल्याला सेविंग अकाउंट बद्दल पूर्ण माहिती, सेविंग अकाउंट फायदे किंवा सेविंग अकाउंट चे किती प्रकार असतात हे या आर्टिकल मध्ये समजेल.
आपल्याला माहीतच आहे. बँकांमध्ये वेगवेगळ्या खाते उपलब्ध असतात. जसे की महिला खाते, पेन्शन खाते , सॅलरी खाते, जनधन योजना खाते ,अशा भरपूर प्रकारचे खाते बँकेमध्ये उपलब्ध आहेत.
या सर्व खतांबद्दल सर्वसामान्य लोकांना पूर्ण माहिती नसते. परंतु या सर्व खात्यांमध्ये सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे खाते सर्वसाधारण लोक काढतात. त्यामध्ये सेविंग अकाउंट Saving Account म्हणजेच बचत खाते आणि करंट अकाउंट Current Account म्हणजेच चालू खाते. हे खाते सर्व साधारण लोक काढतात.
परंतु सर्वसाधारणपणे सर्वांनाच सेविंग अकाउंट बद्दल पूर्ण माहिती आहे का? नेमकं सेविंग अकाउंट मध्ये किती प्रकार आहेत. आपण सेविंग अकाउंट चा फायदा कसा करून घेऊ शकतो हे सर्वांना माहीत नसतं. त्यामुळे आपण बँकेमध्ये जाऊन सर्वसाधारणपणे फॉर्म घेऊन, भरून एक सेविंग अकाउंट काढतो.
त्यानंतर त्यामध्ये पैसे ठेवतो, काढतो या व्यतिरिक्त त्याचा युज करत नाही. कारण आपल्याला त्याबद्दल जास्त माहिती नसते. पण या आर्टिकल मध्ये तुम्हाला सेविंग अकाउंट बद्दल झिरो पासून ते लास्ट पर्यंत पूर्ण माहिती दिली जाईल.
जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये थोडासा भर पडेल आणि तुमचा सेविंग अकाउंट तुम्हाला कसं हाताळायचं हे तुम्हाला समजेल.
तुम्हाला माहीतच आहे. बँकांमध्ये खाते उघडणे आता खूप गरजेचे झाले आहे. कारण प्रत्येक ठिकाणी बँकेचे खाते हे जोडावे लागते. उदाहरणार्थ बँकेचे खाते हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असते. कारण त्यावरती शिष्यवृत्ती किंवा त्यांना सरकारकडून भेटलेले वेगवेगळ्या प्रकारचे मानधन त्यांच्या खात्यावरती जमा होते.
सोबतच पगारधारासाठी सेविंग अकाउंट गरजेचे असते कारण त्यावरती त्यांचा पगार येतो त्यासोबतच गृहिणी, शेतकरी, शेतमजूर या सर्वांनाच बँकेत खाते काढणे हे आता आवश्यक झाले आहे.
आता खात्याचे एवढे सगळे प्रकार आहेत. देशांमध्ये प्रत्येक लोकांना खाते काढायचा आहे. पण त्यांच्या गरचा वेगवेगळे आहेत. मग बँकेमध्ये खाते काढण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे खाते काढायचे याबद्दल माहिती नसल्यामुळे आपला गोंधळ उडतो. चला तर मग जाणून घेऊया सेविंग अकाउंट बद्दल पूर्ण माहिती.
आज आपण बचत खात्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत.
बचत खाते म्हणजे काय? Saving Account Meaning In Marathi
सेविंग अकाउंट म्हणजेच मराठीमध्ये आपण याला बचत खाते असे म्हणतो. व करंट अकाउंट म्हणजेच चालू खाते असे म्हणतो. हे सेविंग अकाउंट सर्वसाधारण लोकांसाठी असते. ज्या लोकांना आपल्या पगारीतून पैशातून काही प्रमाणात बचत करायचे असेल त्यांच्यासाठी हे सेविंग अकाउंट असते.
सर्वसाधारणपणे सेविंग अकाउंट हे सर्वांसाठीच असते. आपण कमावलेल्या पगारातून बचत करण्यासाठी बचत खात्याचा वापर केला जातो. आपल्या खात्यावर ठराविक वेळेत ठराविक रक्कम जमा ठेवण्यासाठी बचत खाते वापरले जातात.
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी, तसेच गॅस सबसिडी जमा करण्यासाठी. शासकीय निधी मिळवण्यासाठी आणि इतर कामासाठी बचत खात्याच्या उपयोग केला जातो.
आज-काल पैसे कसे वाचवायचे हे जाणून घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपण कमवलेले पैशातून आपण सर्वात पहिलं जे सेविंग करतो ती सेविंग नेमकं ठेवायची कुठे तर आपण ती केलेली सेविंग ही आपल्या सेविंग अकाउंट म्हणजेच बचत खात्यावर ठेवू शकतो.
अशाप्रकारे बचत खात्याकडून आपल्याला खूप साऱ्या सुविधा मिळतात. म्हणजेच बचत खात्याच एटीएम कार्ड ATM Card असेल किंवा चेक बुक, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सर्व सुविधा बचत खात्याकडून आपल्याला मिळतात.
एटीएम कार्डचा ATM Card युज करून आपण कोठेही पैसे काढू शकतो. तसेच चेक बुक मुळे आपण मोठ्या प्रमाणावर पैसे चा व्यवहार करू शकतो. इंटरनेट बँकिंग मुळे आपल्याला घरी बसल्या पैसे ट्रान्सफर करता येतात.
आणि मोबाईल बँकिंग मुळे आपल्या अकाउंट ची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला घरी बसल्या मिळते. अशा प्रकारे सेविंग अकाउंट चे भरपूर फायदे आपल्याला मिळतात.
यासोबतच सेविंग अकाउंट च्या अजून एक फायदा म्हणजे आपल्याला आपल्या सेविंग केलेल्या पैशांवरती व्याजदर सुद्धा भेटतो. व्याजदर हा तीन टक्के 3% ते सहा टक्के 6% पर्यंत मिळतो. प्रत्येक बँकांमध्ये त्यांचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे काही बँकांमध्ये कमी व्याजदर मिळतो तर काही बँकांमध्ये जास्त व्याजदर मिळतो.
बचत खात्यांचे दोन प्रकार पडतात .
- वैयक्तिक खाते Single Account
- संयुक्त खाते Joint Account
बचत खात्यामध्ये वैयक्तिक खात्याला आपण सिंगल अकाउंट आणि संयुक्त खात्याला आपण जॉईंट अकाउंट असं बोलतो.
चला तर मग जाणून घेऊया सेविंग अकाउंट च्या सिंगल अकाउंट मध्ये काय फायदा आहे.
- वैयक्तिक खाते Single Account
एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक खाते म्हणजेच सिंगल अकाउंट या खात्यावरचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी खूप जणांची आवश्यकता नाही. तर एका व्यक्तीचीच आवश्यकता असते.
या खात्यामधील सर्व निर्णय हे या व्यक्तित्वारे घेतले जातात. यामध्ये दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचाचा हस्तक्षेप नसतो. एका व्यक्तीसाठी वैयक्तिक उघडले गेलेले खाते म्हणजेच वैयक्तिक खाते.
या खात्यामध्ये वारसा नोंदीची सोय केली असते. यामुळे काय होते , जेणेकरून या खातेदारकाच्या पश्चात खात्यावरील व्यवहार, रक्कम सर्व खातेदाराच्या नोंद केलेल्या वारसाच्या नावावर केली जाते. जेणेकरून या खात्यावरील सर्व रक्कम ही खातेदाराच्या वारसाला मिळावे.
- संयुक्त खाते Joint Account
दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून काढलेले खाते म्हणजेच संयुक्त खाते किंवा जॉईंट अकाउंट असते. संयुक्त खाते उघडत असताना दोन किंवा जास्त व्यक्ती सोबत असल्यामुळे काढण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात यापैकी काही सूचना खालील प्रमाणे.
- Either or survivor
- Jointly buy all
- former of Survivor
- Anyone or survivor
वरती दिलेल्या सूचना बदलण्यासाठी सर्व खातेदारांची संमती आवश्यक असते. म्हणजेच खाते उघडत असताना दोन लोकांनी मिळून उघडले असेल किंवा मग तीन लोकांनी मिळून उघडले असेल तर हे नियम बदलण्यासाठी तिघांची संमती आवश्यक असते.
परंतु या खात्यावरील रक्कम किंवा एखादी पेमेंट जर थांबवायचे असेल तर कोणत्याही एका खातेदारांनी जर संमती दिली तर थांबली जाते. त्यामुळे एखादी पेमेंट स्टॉप करायचे असेल तर कोणते एक खातेदार ती स्टॉप करू शकतो.
संयुक्त खाते उघडण्यासाठी खातेदारांनी बचत खात्याच्या फॉर्मवर भरून त्यावरती सगळ्या खातेदारांच्या सह्या घेणे गरजेचे असते. सिंगल अकाउंट सारखेच जॉईंट अकाउंट मध्ये सुद्धा वारसदाराचे नोंदणीची सोय असते. या अकाउंट वर वारसाची नोंद ही सर्व खातेदार मिळून करतात.
बचत खाते कसे उघडायचे ? Saving Account Meaning in Marathi
खाते उघडण्यासाठी आपल्याला आपले खाते ज्या बँकेमध्ये उघडायचे आहे, त्या बँकेमध्ये जाऊन तिथे सेविंग अकाउंट चा फॉर्म भरून घ्यावा लागेल. तो फॉर्म बँकेत द्यावा लागेल. हा फॉर्म फ्री मध्ये बँकेकडून खातेधारकांना मिळतो.
यासाठी कुठलाही शुल्क भरायची गरज लागत नाही. हा फॉर्म भरत असताना आपल्याला आपली सर्व माहिती अचूक भरावी लागते. यामध्ये आपल्याला एकदम सोपी माहिती भरायचे असते उदाहरणार्थ
- तुमचं नाव
- तुमचा पत्ता
- तुमचं कायमचा पत्ता
- जन्मतारीख
- मोबाईल नंबर
- नॉमिनी नेम Nominee Name
एखाद्या निश्चित व्यक्तीचे नाव म्हणजेच त्या बँकेमध्ये त्या व्यक्तीचं अकाउंट आधीच असलं पाहिजे. अशा व्यक्तीचा रेफरन्स म्हणून नाव आपल्याला भरावा लागतो यालाच नॉमिनी नेम सुद्धा म्हणतात.
फॉर्म भरून आपल्याला बँकेतील कर्मचाऱ्याजवळ द्यावा लागतो. अशाच पद्धतीने आपल्या बचत खाते सेविंग अकाउंट त्या बँकेमध्ये उघडले जाते. यासाठी कमीत कमी टाईम लागतो. परंतु आपल्याला त्या बँकेचं एटीएम कार्ड ATM Card भेटण्यासाठी व पासबुक भेटण्यासाठी थोडा कालावधी लागतो.
सेविंग अकाउंट उघडण्यासाठी खातेदाराला आपली केवायसी KYC कागदपत्रे हे सादर करावे लागतात. केवायसी कागदपत्रांमध्ये आपले ओळखपत्रे, आयडेंटी कागदपत्रे, पत्त्याचा पुरावा म्हणजेच.
आधार कार्ड , पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा हे आवश्यक असते. बँकेकडून कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतरच खातेधारकाला बचत खाते उघडण्यासाठी परवानगी मिळते.
बचत खाते उघडण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे Documents Required for opening a Saving Account
केवायसी (KYC) कागदपत्रे
- ओळखीचा पुरावा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- चालक प्रवाह
- मतदार ओळखपत्र
- ऍड्रेस पुरावा
पत्ता पुरावा Address Prof
- युटिलिटी बिल( लाईट बिल ,फोन बिल, दोन महिन्यापेक्षा कमी जुने )
- बँक खाते
- वितरण ग्राहकाच्या निवासस्थानची पत्त्याची पडताळणी करणारे मान्यता प्राप्त सार्वजनिक प्रदीकरणाचे पत्र
आपल्याजवळ जर वरी दिलेली सर्व कागदपत्रे असतील, तर बँकेमध्ये फॉर्म भरून खाते उघडण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. आता नवीन बँकेत खाते उघडण्यासाठी खूप कमी कागदपत्रे लागतात या सोबतच घरी बसल्या सुद्धा अकाउंट उघडू शकतो.
बचत खात्याचे प्रकार Types Of Saving Account
- बचत खाते Saving Account
- सॅलरी खाते Salary Account
- पेन्शन खाते Pension Account
- मायनर खाते Mainer Account
- महिला बचत खाते Women Saving Account
- झिरो बॅलन्स खाते ,जनधन खाते BSBDA- Basic Saving Bank Deposit Account
जनरल बचत खाते Saving Account
जनरल खाते हे मूलभूत प्रकारचे खाते आहे. सर्वसाधारणपणे बचत करण्यासाठी व आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जनरल खात्याचा उपयोग केला जातो. आपण केलेल्या पैशाच्या बचतीवर बँकेकडून ठराविक व्याज ही दिले जाते.
या खात्यात आपण रक्कम भरूही शकतो व वेळेवर त्यातून आपण रक्कम काढू शकतो. हे खाते काढताना आपल्याला एक अट असते. ती म्हणजे हे खात्यामध्ये कमीत कमी रक्कम ठेवायचे अट असते. या रक्कमेच्या खाली आपला अकाउंट गेलं तर आपल्याला बँकेकडून दंड आकारला जातो.
सॅलरी खाते Salary Account
सॅलरी खाते म्हणजेच पगार खाते. हे खाते आपल्याला महिन्याचा आलेला पगार, सॅलरी जमा करण्यासाठी वापरले जाते. आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनी द्वारा पगार जमा करण्यासाठी सॅलरी खाते उघडून दिले जाते.
कंपनीद्वारे काढलेल्या या अकाउंटला सॅलरी खाते किंवा पगार खाते असं बोलतो. सॅलरी खात्यावर देखील दुसऱ्या खात्याप्रमाणेच बँकेकडून व्याजदर लागतो. व बँकेच्या सुविधा द्वारे या खातेधारकांना अनेक सुविधांचा लाभ देखील मिळतो.
पेन्शन खाते pension Account
पेन्शन खाते pension Account हे जनरल सेविंग खात्याप्रमाणेच असते पेन्शन कोणाला भेटते तर निवृत्त झालेल्या कर्मचारी वर्ग असेल किंवा नोकरदार वर्ग असेल यांना आपल्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सुरू होते.
त्यासाठी या खात्याचा वापर केला जातो. आपली पेन्शन ही आपल्या खात्यावरती जमा होण्यासाठी पेन्शन खात्याचा वापर केला जातो. इतर खात्याप्रमाणेच पेन्शन खात्याला सुद्धा विशेष सवलती दिली जाते.
मायनर खाते Mainer Account
मायनस खाते म्हणजे ज्या व्यक्तीचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी (less than 18) असेल त्यांच्या खात्याला मायनर खाते असे म्हटले जाते. मायनस खाते हे पालकासोबत काढले जाते.
मायनर खाते हे अठरा वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठी काढले असल्यामुळे या खात्यावरील सर्व व्यवहार हे मायनर चे पालक पूर्ण करतात. पण खातेधारकांच्या वयाचे दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर या खात्याचा रूपांतर वैयक्तिक खात्यामध्ये होतं.
महिला बचत खाते Women Saving Account
महिला बचत खाते हे विशेषता महिलांसाठी तयार केलेली एक योजना आहे. जेणेकरून प्रत्येक महिला ही आपल्या बचत खात्यावरती आपली बचत ठेवेल.
याबाबत खात्यावरती महिलांसाठी वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. उद्योगासाठी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देखील या खात्यावरून मिळाले जाते
झिरो बॅलन्स खाते ,जनधन खाते BSBDA- Basic Saving Bank Deposit Account
झिरो बॅलन्स अकाउंटला मुळात बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट(BSBDA) या अकाउंटला जनधन खाते असेही म्हणतात. हे जनधन खाते भारतातील प्रत्येक व्यक्ती उघडू शकतो.
झिरो बॅलन्स खात्याचा वैशिष्ट्य म्हणजे हे दुसऱ्या खात्याप्रमाणे म्हणजेच संयुक्त आणि वैयक्तिक खात्याप्रमाणे या खात्याला अटी नसतात. या खात्या ला बेसिक सेविंग बँक डिपॉझिट अकाउंट असेही म्हटले जाते.
तसेच सामान्य भाषेत दुसऱ्या खात्यामध्ये खाते उघडत असतानाच तुम्हाला बँकेकडे किमान शुल्लक रक्कम ठेवावी लागते. व बँकेतून पैसे काढताना देखील आपल्याला तेवढी अमाऊंट बँकेमध्ये ठेवून उरलेले पैसे काढावे लागतात. त्यामुळे कित्येक वेळेस आपण अडचणी मध्ये सुद्धा येतो.
परंतु झिरो बॅलन्स अकाउंट हे सर्वांसाठी आहे. यामध्ये आपण अकाउंट काढत असताना कोणत्याही प्रकारचा शिल्लक रक्कम बँकेमध्ये ठेवायची गरज नाही व बँकेतून पैसे काढत असताना देखील आपल्याला शिल्लक अकाउंट बँके मध्ये ठेवायची गरज पडत नाही.
जनधन खात्याची वैशिष्ट्ये Feature Of Zero Balance Account
- झिरो बॅलन्स अकाउंट तसेच जनधन खात एकट्याने किंवा संयुक्तपणे उघडता येत.
- झिरो बॅलन्स अकाउंट, झिरो बॅलन्स वर उघडता येते म्हणजे जनधन योजनाच्या अकाउंट मध्ये रक्कम शिल्लक ठेवण्याची कोणतीही अडचण नसते. खात्यामधून सामान्य बचत बँके खात्याप्रमाणे ठेव रक्कम ठेवता येते.
- म्हणजेच बँक किंवा एटीएम मधून पैसे काढणे, इंटरनेट बँकिंग , मोबाईल बँकिंग, निधी हस्ताक्षर करून पैसे काढणे, केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारा रक्कम या बँकेमध्ये जमा ठेवणे हे सर्व मोफत असते.
- यावर कोणताही वार्षिक शुल्क नसतो. BSBDA खाते चालू नसले तरीही कोणतेही शुल्क आकारले जात नाही
- तसेच हे झिरो बॅलन्स अकाउंट बंद जरी केले, तरी बँकेकडून कोणतेही शुल्क आपल्याला भरावे लागत नाही.
जनधन योजना नियम Conditions of BSBDA Account
जनधन योजना किंवा झिरो बॅलन्स अकाउंट अशा खात्यामधून एकूण एका वर्षात एक लाख पेक्षा जास्त व्यवहार करू नये.
आपल्या खात्यात शिल्लक रक्कम ही पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त नसावी.
जनधन खात्यामध्ये रोख रक्कम काढणे आणि भरणे यासाठी एकूण काढण्याची रक्कम एका महिन्यामध्ये दहा हजार रुपये पेक्षा जास्त होऊ शकत नाही.
बचत खात्याची वैशिष्ट्ये Features Of Saving Account
- बचत खात्यामध्ये पगार धारकांना त्यांचे नियमित पगार आल्यानंतर खर्च करून उरलेले निव्वळ उत्पन्न हे भविष्यासाठी बचत करू शकता येते.
- बचत खात्यातील रक्कमेवर आपण व्याज मिळू शकतो.
- बचत खात्यात एखादी व्यक्ती कितीही वेळ आपले रक्कम बचत करून ठेवू शकते त्यासाठी मर्यादा नाही.
- आज-काल सर्व बँकांमध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग असल्यामुळे बचत खातेदारांना त्यांची शिल्लक रक्कम बघण्यासाठी बँकेमध्ये जायची गरज नाही.
- घरी बसल्या आपली शिल्लक अमाउंट चेक करू शकतात. तसेच IMPS, RTGS, NFET या सुविधा सुद्धा वापरू शकतात. ऑनलाइन खातेधारकाला चेक बुक साठी बँकेकडे अर्ज देखील करता येतो.
- खातेधारकाला आपल्या बचत खातेतून त्याचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरून ऑनलाईन खरेदी करता येते.
- बचत खातेदारांना ऑनलाइन पोर्टल वापरून कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट करता येते. उदाहरणार्थ फोन रिचार्ज, टीव्ही डीटीएच रिचार्ज हे सर्व करू शकतो.
- खातेदारांना कमी व्याज दारात आकर्षक कर्ज आणि वेगवेगळ्या योजना सवलती सुद्धा मिळतात.
- ग्राहकाचं कोणत्याही प्रकारचं लोन असेल तर आपण आपले लोन चे ईएमआय EMI ऑनलाईन भरू शकतो. क्रेडिट बिल हेही भरू शकतो.
- Saving Account Meaning In Marathi याबद्दलची माहिती तुम्हाला अचूक आणि उपयुक्त वाटले असेल. तर मला नक्की कळवा यामुळे तुम्हाला सेविंग अकाउंट बद्दलची थोडीफार माहिती मिळाली असेल ही आशा करते.
सेविंग अकाउंट चा अर्थ काय आहे? What is saving account meaning in Marathi?
वरील लिहिलेल्या पोस्ट वरती पूर्ण सेविंग अकाउंट बद्दल माहिती दिली आहे. परंतु सेविंग अकाउंट चा अर्थ असा बचत खाते आहे, म्हणजेच तुम्हाला पैसे जमा करण्यासाठी काढलेले सर्वसामान्य खाते म्हणजेच सेविंग अकाउंट या अकाउंट मध्ये दरमहा व्याज मिळवण्यासाठी सवलती असतात.
पगार खाते , सॅलरी अकाउंट बचत खाते आहे का? Is Salary Account is Saving Account ?
पगार खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट हे एक प्रकारचे सेविंग अकाउंट आहे. म्हणजेच प्रत्येक बचत खाते चा एक प्रकार आहे ज्यामध्ये दर महिन्याला आपला पगार निश्चित वेळेवर आणि निश्चित रक्कम जमा होत असते.S