कमी व्याजावर पर्सनल लोन कसे मिळवायचे
पर्सनल लोन कसं मिळतं? कमी व्याजावर पर्सनल लोन घेण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे, आपल्याला पर्सनल लोन किती मिळू शकतो, पर्सनल लोन भेटण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, पर्सनल लोन कोणत्या बँक मध्ये कमी व्याजदर मिळतं, अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळतील तरी तुम्ही हे आर्टिकल पूर्ण वाचा.
आपण पर्सनल लोन हे कोणत्याही कामासाठी घेऊ शकतो. पर्सनल लोन घेण्यासाठी कोणता क्रायटेरिया नाहीये की पर्सनल लोन याच गोष्टीसाठी मिळतात तुमच्या पर्सनल घरचा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता त्यामध्ये हॉस्पिटल स्कूल स्पेस घरगुती सामान किंवा मग कोणत्याही कामासाठी तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता.
पर्सनल लोन घेत असताना काही काळजी घ्यावी लागते कारण पर्सनल लोनचे व्याजदर हे खूप जास्त असतात. त्यामुळे पर्सनल लोन घेत असताना सगळीकडे चौकशी करून कोणत्या बँक मध्ये तुम्हाला सर्वात कमी व्याजावर पर्सनल लोन मिळतं हे बघा त्यानंतरच पर्सनल लोन घ्या. पर्सनल लोन मुळे आपला सिबिल स्कोर वाढतो. पण या पर्सनल लोन मुळे सिबिल स्कोर कमी सुद्धा होतो. त्यामुळे पर्सनल लोन घेत असताना काळजी घ्यावी.
कोणत्याही प्रकारचे अडचण आली तर आपण पर्सनल लोन घेऊ शकतो. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोन आपल्याला मिळून जात. त्यामुळे अडचणीमध्ये घाबरायची गरज नाही. परंतु पर्सनल लोन हे खरंच खूप गरज असते तेव्हाच घ्यावे. पर्सनल लोन हे तीन ते चार दिवसांमध्ये भेटून जात. पर्सनल लोन मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू प्रॉपर्टी ही बँक कडे ठेवायची गरज लागत नाही.
पर्सनल लोन कसं मिळतं.
पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागते. हे कागदपत्रा मुळे समजून येतं की तुम्हाला पर्सनल लोन किती मिळेल. या कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे असे असतील ज्यामुळे बँकांना समजून येईल की तुम्ही महिन्याला किती पैसे कमवता.
प्रति महिना तुम्ही किती व्याज भरू शकता, यावरूनच तुम्हाला बँक लोन देते बँक सर्वप्रथम याची पडताळणी करते, की ज्या व्यक्तीला आपण लोन देत आहोत ती व्यक्ती ते लोन व्याजासहित बँकेला परत करू शकते का .
पर्सनल लोन मध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी वेगळी कागदपत्रे आणि व्यापार करण्यासाठी वेगळी कागदपत्रे लागतात. व्याजदर सुद्धा काही प्रमाणात बदल असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया पासून साठी कोणते कागदपत्रे लागतात.
तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी लागणारी कागदपत्रे
- पॅन कार्ड Pan Card
- आधार कार्ड Aadhar Card
- लाईट बिल चालू Light Bill
- ऑफिस ऍड्रेस प्रूफ Address Prof
- ऑफिसचा आयडी कार्ड व इत्यादी ID Card
- नोकरीचे सॅलरी स्लिप चालू तीन महिन्याची Salary Slip
- फॉर्म 16 दोन वर्षाचा Form 16
- बँक स्टेटमेंट चालू सहा महिन्याचे
- पासपोर्ट साईज फोटो लोन घेणाऱ्या व्यक्तीचे
तुम्ही व्यापार करत असाल तर तुमच्यासाठी लागणारी कागदपत्रे
- पॅन कार्ड Pan Card
- आधार कार्ड Aadhar Card
- लाईट बिल तुम्ही राहत असलेल्या घराचे
- बिजनेस ऍड्रेस तुमच्या कार्यालयाचा किंवा दुकानाचा पत्ता
- रजिस्ट्रेशन तुमच्या बिजनेस रजिस्ट्रेशन केलेल्या पेपर
- इन्कम टॅक्स रिटर्न चालू 2 वर्षाचा Income Tax Return
- बँक स्टेटमेंट चालू 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट
- पासपोर्ट साईट फोटो पर्सनल लोन साठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचे.
जर तुमच्याजवळ हे सर्व कागदपत्रे असतील, तर तुम्ही पर्सनल लोन साठी लगेच अप्लाय करू शकता. तुम्ही हे सर्व कागदपत्रे एकत्रित करून तुमच्या सरकारी बँक कडे पर्सनल लोन साठी चौकशी शकता. कारण सरकारी बँकेमध्ये व्याजदर हे कमी असतं आणि फायनान्स मध्ये पर्सनल लोन साठी व्याजदर हा जास्त असतो.
सर्वात सोपे तुम्ही पर्सनल लोन साठी तुमचा करंट किंवा सेविंग अकाउंट च्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये सर्वात प्रथम चौकशी करा. त्या बँकेमधून तुम्हाला पर्सनल लोन हे लवकर मिळू शकत. कारण तुम्ही त्या बँकेचे आधीपासून ग्राहक आहात.
काही कारणांमुळे जर तुम्ही तुमच्या बँकेमधून किंवा कोणत्याही सरकारी बँकेमधून पर्सनल लोन साठी वैध नसाल. तर तुम्ही इतर प्रायव्हेट बँका किंवा फायनान्स बँकांमध्ये चौकशी करू शकता.
प्रायव्हेट बँकांमधून तुम्हाला पर्सनल लोन हे खूप लवकर मिळून जातात कारण तिथे व्याजदर हे थोडे जास्त असतात. परंतु तुमच्या अडचणीच्या वेळेस तुम्हाला लवकरात लवकर पैसेही प्रायव्हेट बँका पर्सनल लोन म्हणून देतात.
पर्सनल लोन कोण कोणत्या बँक देतात
पर्सनल लोन हे आपल्या निजी कामासाठी घेतले जाते. तुम्ही भरपूर सरकारी, प्रायव्हेट बँकांमध्ये किंवा फायनान्स मध्ये पर्सनल लोन साठी संपर्क साधू शकता. अशा काही बँकांची नावे खालील प्रमाणे ज्या बँकांमधून तुम्ही पर्सनल लोन साठी अप्लाय करू शकता.
सरकारी बँका ज्या बिजनेस लावून देतात
- एसबीआय बँक SBI Bank
- बँक ऑफ बडोदा Bank of Baroda
- बँक ऑफ इंडिया Bank of India
- युनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India
काही कारणामुळे तुम्ही सरकारी बँकेमधून लोन घेऊ शकत नसाल, तर तुम्ही खाली दिलेल्या प्रायव्हेट बँकांमध्ये संपर्क साधू शकता, पर्सनल लोन देणाऱ्या सर्वात मोठ्या आणि कमी व्याजदरावरील पर्सनल लोन देणाऱ्या बँका खालील प्रमाण.
या प्रायव्हेट बँका पर्सनल लोन देतात
- एचडीएफसी बँक HDFC Bank
- आयसीआयसीआय बँक ICICI Bank
- कोटक महिंद्रा बँक Kotak Mahindra Bank
- आयडीएफसी बँक IDFC Bank
- एस बँक Yes Bank
सर्वात शेवटी फायनान्स बँक येतात ज्या बँका पर्सनल लोन मध्ये सर्वात जास्त पुढे असतात. भारतामध्ये सर्वात जास्त पर्सनल लोन देणाऱ्या फायनान्स बँका असतात. दर सरकारी बँका आणि प्रायव्हेट बँका पेक्षा जास्त असतो
या फायनान्स कंपन्या पर्सनल लोन देतात.
- बजाज फायनान्स Bajaj Finance
- ऍक्सिस फायनान्स Axis Finance
- टाटा कॅपिटल Tata Capital
- आदित्य बिर्ला कॅपिटल Aditya Birla Capital
- लेंडिंगकार्ट Lending kart
जर तुमचं सिबिल स्कोर हा कमी असेल तर तुम्ही फायनल बँकांमधून पर्सनल लोन घेऊ शकता. यामुळे तुमचा सिबिल स्कोर हा वाढेल पण जेव्हा सिव्हिल स्कोर वाढेल तेव्हा तुम्ही तुमच्या लोन हे सरकारी बँकेमध्ये ट्रान्सफर करून घ्या. जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल तुमचा व्याजदर कमी लागेल आणि सरकारी बँकेमधून लोन सुद्धा जास्त मिळेल..
पर्सनल लोन साठी व्याजदर काय आहे
सरासरी पर्सनल लोन मध्ये व्याजदर हा 10.50% पासून ते 35% इतका असतो. वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या व्याजदर असतो. पण पर्सनल लोनचा व्याजदर हा तुमच्या प्रोफाइल आणि सिविल स्कोर वरती निर्भर असतो.
जेवढी चांगली तुमची प्रोफाइल असेल. म्हणजे नोकरी किंवा बिझनेस असेल तर तुम्हाला कमी व्याजदरामध्ये जास्तीत जास्त पर्सनल लोन मिळतं, आणि तुमचा सिबिल स्कोर सुद्धा चांगला असला पाहिजे.
सिबिल स्कोर कमीत कमी 700 ते 750 च्या पुढे असला पाहिजे. सिबिल स्कोर खराब असेल तर तुमचे लोन हे नाकारले सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे सिबिल स्कोर वरती नेहमी लक्ष ठेवा.
तुम्ही कोणत्या कारणासाठी पर्सनल लोन लाअप्लाय करू शकता.
तुम्ही खूप सार्या कारणांसाठी पर्सनल लोनला अप्लाय करू शकता. जसं की लग्न, मेडिकल अडचणी, शिक्षण, एज्युकेशन, हॉलिडेज साठी या व्यतिरिक्त कुठल्याही अन्य कामासाठी.
पर्सनल लोन हे ऑनलाईन मिळू शकतं का?
हो, पर्सनल लोन हे ऑनलाईन मिळू शकतं. जर तुम्हाला घरी बसल्या पर्सनल लोन पाहिजे असेल, तर तुम्हाला ऑनलाईन पर्सनल लोन मिळू शकतो. जर तुमच्या घरापासून बँक खूप लांब आहे किंवा तुमच्याकडे एवढा वेळ नाही.
तुम्ही पर्सनल लोन साठी बँकेमध्ये जाऊन चौकशी कराल तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन पर्सनल लोन साठी चौकशी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये बँक या फायनान्स कंपनी चे लोणचे ॲप डाऊनलोड करावे लागतील.
ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही त्यात ओपन करून तुमची माहिती भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, पत्ता, पॅन कार्ड, तुमचा फोन नंबर, आधार कार्ड नंबर, तुमचं महिन्याचा येणारा पगार, तुमचा सिबिल स्कोर इत्यादी ची पडताळणी केली जाते.
तुम्ही भरलेली माहिती अचूक असेल आणि तुमचं कागदपत्राचं पडताळणी बरोबर झाली असेल. तर तुम्हाला लोन साठी आपल्या करता येतो.
बँक चे ॲप मध्ये तुम्हाला तुमच्या पडताळणीसाठी कागदपत्रे सुद्धा अपलोड करावे लागतात. हे कागदपत्रे ॲप मध्ये अपलोड केल्यानंतर पाच ते दहा सेकंदामध्ये आपले पूर्ण कागदपत्रे चेक केले जातात जर या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नसेल तर बँक तुम्हाला लगेच बँक अकाउंट कन्फर्मेशन करते.
यासाठी तुम्हाला बँक एक रुपया क्रेडिट करते. कन्फर्मेशन झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये लोणचे पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होते. अशा प्रकारे घरी बसल्या कमीत कमी वेळामध्ये तुम्ही पर्सनल लोन साठी अप्लाय करू शकता.
सर्वात स्वस्त पर्सनल लोन कोणत्या बँकेमध्ये मिळतो
वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळे व्याजदर आहेत. त्यामध्ये सर्वात कमी व्याजदर हे सरकारी बँकेच्या त्यानंतर प्रायव्हेट बँकेच्या आणि त्यानंतर सर्वात जास्त व्याजदर हे फायनान्स कंपनीचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया या सर्व बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदर असलेल्या पर्सनल लोन साठीच्या बँका.
पंजाब नॅशनल बँक Panjab National Bank
पंजाब नॅशनल बँक तुम्हाला सर्वात कमी व्याजदर असलेले पर्सनल लोन देते या बँकेमध्ये पर्सनल लोनचा बाजार हा 7.90 टक्के इतका आहे. पंजाब नॅशनल बँक ही ग्राहकाला 60 महिन्यासाठी पर्सनल लोन देते.
बँक ऑफ महाराष्ट्र Bank Of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्र बँक तुम्हाला पर्सनल लोन साठी 8.95% इतका वार्षिक व्याजदर देते. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुद्धा तुम्हाला 12 महिन्यापासून ते 60 महिन्यापर्यंत पर्सनल लोन दिले जाते. बँक ऑफ महाराष्ट्र बँक ही तुम्हाला एक लाखापासून 1L ते दहा लाख 10L रुपये पर्यंत पर्सनल लोन देऊ शकते.
सिटी युनियन बँक City Union Bank
सिटी युनियन बँक ही तुम्हाला पाच लाखापर्यंत पर्सनल लावून देते आणि याचा व्याजदर हा 9.50% वर्षासाठी इतका असतो.
युनियन बँक ऑफ इंडिया Union Bank Of India
युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लोन मिळतं. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये एक लाख रुपये पासून ते १५ लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन हे ग्राहकाला दिले जाते.
परंतु हे लोन तुम्हाला 5 ते 7 वर्षासाठी दिले जाते. युनियन बँक ऑफ इंडिया चे व्याजदर 8.90% ते 13 टक्के इतपर्यंत असतात व्याजदर हे पूर्णतः तुमच्या प्रोफाईल आणि सिबिल स्कोर वरती अवलंबून असतात.
एसबीआय बँक SBI Bank
एसबीआय बँक सरकारी बँक आहे. या बँकेमध्ये तुम्हाला एक लाख रुपये पासून ते 25 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन मिळू शकते एसबीआय बँक चा व्याजदर हा ९.१५%ते १३.५० टक्के इतपर्यंत असतो. या बँकेमध्ये तुम्हाला एक वर्षापासून ते सात वर्षांपर्यंत हे लोन परतफार करण्यासाठी वेळ दिला जातो.
इंडियन बँक Indian Bank
इंडियन बँकेमध्ये तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन मिळतं. या लोन साठी तुम्हाला व्याजदर म्हणून 9.5 ते 13.60 इथपर्यंत शुल्क बँकेला द्यावा लागतो हे व्याजदर वार्षिक व्याजदर असते आणि यासाठी तुम्हाला पाच ते सात वर्षापर्यंत कालावधी दिला जातो.
सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला कोणती बँक पर्सनल लोन देऊ शकते
कोणत्याही पद्धतीचे लोन घेण्यासाठी बँकेमध्ये सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला किती रुपये लोन मिळेल, किंवा आपल्या लोणचं कालावधी या व्यतिरिक्त व्याजदर किती मिळेल, या सर्व गोष्टींसाठी आपला सिबिल स्कोर आपल्याला खूप जास्त मदत करतो.
त्यामुळे सिबिल स्कोर हा चांगला असेल तर कोणत्या बँकेमध्ये आपल्या लोन साठी अप्रुव्हल मिळते. परंतु जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपण कोणत्या बँकेमध्ये अप्लाय करावे जेणेकरून आपल्याला पर्सनल मिळेल.
जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल, तर तुम्ही कोणत्याही पद्धतीच्या फायनान्स बँकांमध्ये पर्सनल लोन साठी चौकशी केलेली चांगली आहे. कारण ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा खराब असतो, त्यांना फायनान्स बँक मध्ये पर्सनल लोन दिले जाते.फायनान्स बँकेमध्ये व्याजदर हे इतर बँकांच्या तुलनेमध्ये खूप जास्त असतो.
त्यामुळे फायनान्स बँकेकडून पर्सनल लोन घेत असताना काळजी घ्यावी. फायनान्स मधून पर्सनल लोन घेतल्यानंतर तुमचा सिबिल स्कोर हा वाढू शकतो. परंतु जर तुम्ही प्रत्येक महिन्याला व्याज बरोबर भरले नाही तर तुमचा सिबिल स्कोर अजून जास्त खराब होऊ शकतो.
आधार कार्ड वर जाणून घेऊया की पर्सनल लोन कोण कोणत्या बँकेकडून घेतलेले आहे.
खूप लोकांना जाणून घ्यायचे असते की याआधी पर्सनल लोन घेतले आहे का? किंवा कोण कोणत्या बँकेमधून पर्सनल लोन घेतले आहे. तर आपण आधार कार्ड वरून हे जाणून घेऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया आधार कार्ड वरून पर्सनल लोन कोणकोणत्या बँकेकडून घेतला आहे हे कसे पाहायचे.
तुम्हाला आठवत नसेल की तुम्ही या आधी कोणत्या बँकेमधून किंवा कोणत्या फायनान्स मधून तुम्ही पर्सनल लोन घेतले आहे. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड चा वापर करू शकतो. आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरून आपण पर्सनल लोन कधी व कोणत्या बँकेमधून घेतलं होतं हे आपल्याला समजून जाईल.
हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये असलेला पेटीएम ॲप चा वापर करू शकतो. पेटीएम ॲप ओपन केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करा सर्वात खाली तुम्हाला लॉन्स आणि क्रेडिट कार्ड असं एक ऑप्शन दिसेल. ज्यामध्ये फ्री क्रेडिट स्कोर वर तुम्ही क्लिक करा.
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नंबर टाका आता तुमचा फ्रेंड क्रेडिट स्कोर तुमच्यासमोर दिसेल. त्याच्याखाली आणि डिटेल रिपोर्ट किंवा ऑल लोन्स अँड करियर अकाउंट लिहिलेला असेल तुम्ही ऑल लॉन्स अँड करिअर अकाउंट्स वर क्लिक करून तुमच्या सर्व लोन अकाउंट तुमच्या समोर दिसते जे तुमचे लोन चालू आहेत किंवा तुमचे बंद झालेले असे सर्व प्रकारचे लोन तुम्हाला तुमच्या समोर दिसते.
आशा करते की तू मला वरील माहिती की फायदा करून देईल.