आजचा टाईम ला पैसे कसे कमवायचे? , आणि पैसे कसे वाचवायचे ? , पैसे कुठे गुंतवायचे?, पैसे किती खर्च करायचे ?.
आशे मोठे मोठे प्रश्न तरुण पिढीसमोर येत आहेत . कारण आजकाल पैसे कमावण्यापेक्षा आपण पैसे कुठे खर्च करू शकतो याचे माध्यम खूप वाढले आहेत.
जर आपण आज 50,000/- कमवत असाल, तर आपण दिवसाचे किती आणि कसे खर्च करू शकतो हे सगळ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला बघायला मिळेल.
त्यामुळे कोणीही पैसे कसे कमवायचे किंवा पैसे कसे वाचवायचे हे तुम्हाला सांगणार नाही.
पण नक्की तुम्हाला पैसे कुठे घालवता येतील , तुम्हाला पैसे कुठे खर्च करता येतील ?,तुम्ही काय शॉपिंग करावं, तुम्हाला काय आणि किती शॉपिंग केल्यानंतर डिस्काउंट मिळणार .
या सर्वांच्या जाहिराती तुम्हाला प्रत्येक मिनिटाला बघायला भेटतील .परंतु पैसे कसे वाचवायचे याची एकही जाहिरात तुम्हाला बघायला मिळणार नाही.
तर आपण या आर्टिकलमध्ये पैसे कसे वाचवायचे किंवा पैसे कुठे खर्च नाही करायचं हेच जाणून घेऊया.
आजचा टाईम ला आपण कमवलेले पैसे बहुतांश लोक शॉपिंग वरती उडवतात. ज्या वस्तू गरजेच्या नसतील त्या वस्तू घेण्यासाठी आपला जास्तीत जास्त पैसा खर्च करतात.
तुम्हाला या आर्टिकल मध्ये मी तीन नियम सांगेल जेणेकरून तुमचे पैसे वाचवले जाते.
बहुतांश लोकांचा हा प्रश्न असतो की पैसे गुंतवायचे , पैसे गुंतवल्याने भविष्यामध्ये आपल्याला फायदाही होतो आपल्याला पैशाच्या बदल्यांमध्ये खूप नफाई मिळतो . हे सगळं समजतंय परंतु गुंतवणूक करण्यासाठी पैसा वाचवायचा कसा.
उदाहरणार्थ आपण आपल्याला मिळालेल्या पेमेंट मध्ये हाऊस मोज आणि गरज नसलेली उपकरणे जास्त घेतो. म्हणजे आपला पगार आला की आपण लगेचच ऑनलाईन पोर्टल वरती हुडकतो ,?
कुठे डिस्काउंट मध्ये काही भेटते का? या सर्वमुळे आपली सॅलरी मधला अर्धा भाग तर निघून जातो .त्यानंतर उरलेल्या अर्धा भागांमध्ये खाना ,पिना आणि मग मजा होते .
असाच करताना महिन्याअखेरीस आपल्याला आपल्या पेमेंट ची वाट बघावी लागते .जर आपला महिनाच आपल्या मिळालेल्या पेमेंट वरती निघत नसेल तर आपण गुंतवणूक कशी करणार ना.
गुंतवणूक करायचे आहे तर पहिलं आपल्याला आपल्या कमाई मधून काही पैसे वाचवले पाहिजे. सर्वांना हाच प्रश्न पडतो की गुंतवणूक करायची कशी ?
गुंतवणूक करण्यासाठी पैसे वाचले पाहिजेत ना जर पैसे वाचले तर गुंतवणूक करणार न. हा सेम प्रश्न अनेक जणांना त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये पडतो.
चला तर मग आजचा आर्टिकल मध्ये मी सांगते आपले पैसे वाचवायचे कसे.
मी तुम्हाला पैसे वाचवण्यासाठी तीन गुरु मंत्र सांगणार आहे त्यातील पहिला गुरु मंत्र म्हणजे खालील प्रमाणे.
गुरु मंत्र क्रमांक 1 -वायफट खर्च टाळा
वायफट खर्च टाळा म्हणजे काय? या गुरु मंत्राचा अर्थ काय ,हे मी तुम्हाला विस्तारित सांगते. आजचा लाईफ मध्ये सगळीकडे बचत सुरू असतात.
म्हणजे एखादी कंपनी आपल्या वस्तू आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी वेगवेगळ्या डिस्काउंट ,ऑफर देत राहते .या डिस्काउंट ऑफरला भुरळ जाऊन आपल्यासारखे लोक त्यांचा अर्धा पगार त्यावर घालतात नाही का.
हाच जो खर्च आहे. या खर्चाला वायफट खर्च म्हणतात. म्हणजे ज्या वस्तू आपण घेतो त्या वस्तू आपल्यासाठी तितक्या गरजेचा नसतात मग गरज नसलेल्या वस्तूवर केलेला खर्च म्हणजेच वायपट खर्च.
आता वायफट खर्च टाळायचा तरी कसा, कारण आपल्याला भुरळ घालण्यासाठी मोठ मोठ्या कंपन्या एवढ्या छान छान ऑफर देतात .की कोणीही भुरळ जातं ,मग हा खर्च टाळायचा तरी कसा.
तुम्हाला थोडं मजाक वाटेल परंतु हा खर्च टाळण्यासाठी अशा ॲप किंवा ऑनलाईन पोर्टल जे तुमच्याकडे असतील. हे सगळे Delet करून टाका.
थोडं मजाक वाटेल पण हे खरं आहे. जर तुम्हाला त्या डिस्काउंट, ऑफर, सेल्स डोळ्यासमोर दिसणारच नाहीत. तर त्यावर थोडासा पैसा खर्च करावा अशी इच्छाच होणार नाही.
अनेक वेळा असं होतं की जेव्हा असे डिस्काउंट ऑफर लागतात. महाबचत ऑफर लागतात. तेव्हा तुम्हाला गरज असलेल्या वस्तूपेक्षा तुम्ही गरज नसलेल्या वस्तू सुद्धा घेता.
जेव्हा असे डिस्काउंट, ऑफर, सेल्स लागतो .तुमच्या डोक्यात माहिती पाहिजे की तुमच्या गरजेच्या वस्तू काय आहेत. किंवा तुम्ही चक्क कागदावरती लिहून घ्या. की मला या पाच वस्तू घ्यायच्या आहेत.
सहावी वस्तू घ्यायचे नाही. या व्यतिरिक्त मला माझा पैसा कुठेही खर्च करायचा नाही. जर तुम्ही अशा डिसिप्ल्यांनी कुठल्याही बचत सेलमध्ये गरजेची वस्तू घेण्यासाठी गेलात. तर तुम्ही नक्कीच अशा डिस्काउंट, ऑफर, सेल्स मध्ये सुद्धा पैसे वाचू शकता.
गुरु मंत्र क्रमांक -२ उत्पन्न – खर्च =बचत
गुरु मंत्र क्रमांक दोन जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन समजून घ्यावे लागेल. आपण काय करतो आपलं उत्पन्न जे असेल त्यातून महिनाभर लागलेला खर्च आणि उरलेली बचत असं करतो .
म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जेवढी पगार आहे. त्यातून तुम्ही महिनाभर तुमचा वायफट खर्च , मोजमाजाचा खर्च, गरजेचा खर्च करून उरलेली रक्कम ही बचत म्हणून ठेवतात. यामुळे तुमची प्रत्येक महिन्यामध्ये फिक्स बचत होत नाही.
जर तुम्हाला फिक्स बचत करायचे असेल. तर गुरु मंत्र क्रमांक दोन नीट करावा लागेल. यासाठी तुम्हाला पहिलं उत्पन्न मधून बचत साईडला काढून ठेवावे लागेल. आणि उरलेले पैसे खर्च करावे लागतील.
म्हणजे उदाहरणार्थ तुमची मिळालेल्या पगार मधून वीस टक्के भाग हा बचत म्हणून साईडला काढून ठेवावा लागेल ,व उरलेला भागांमध्ये तुम्ही गरजेच्या वस्तू तुमचं लागणार खर्च, गरजेचा खर्च राहणार हा सर्व खर्च करावा लागेल .
यांनी काय होईल हे बचत केल्यामुळे उरलेल्या पैसामध्येच तुम्हाला खर्च करावा लागेल त्यामुळे वायफट खर्च कमी होईल. पण जर तुम्ही उत्पन्नामधून खर्च करत राहिला आणि उरलेले बचत केलं तर बचत होणार नाही.
लहानपणी तुम्हाला आठवत असेल की तुमचे वडीलधारी लोक घरातील आजी आजोबा किंवा वडील हे तुम्हाला सांगत असतील की मिळालेल्या पैसा मध्ये काही पैसे पहिलं देवासमोर ठेव.
किंवा आपले वडील त्यांच्या उत्पन्नातून पहिला भाग हा देवासमोर ठेवत असतील याचा अर्थ असा होतो, की आपण उत्पन्न मधून सर्वात प्रथम ही बचत केली पाहिजे उरलेली रक्कम खर्चासाठी वापरली पाहिजे.
गुरु क्रमांक दोन समजून घेण्यासाठी तुम्हाला या फॉर्मुल्याची मदत घ्यावी लागेल
उत्पन्न -बचत= खर्च
जर तुम्ही गुरु क्रमांक दोन नुसार तुमच्या महिन्याचा उत्पन्नाची बेरीज लावून ठेवली तर तुम्ही नक्कीच महिन्याअखेरीस भरपूर बचत करू शकाल.
गुरु मंत्र क्रमांक-३ -100%,50%,30%
गुरु मंत्र क्रमांक तीन हे तुम्हाला तुमच्या खर्चाबद्दल नियोजन करायला सांगितले. कसे पुढील प्रमाणे. तुम्ही तुमच्या पैशाचे नियोजन करा ते कसे तर जर तुमचे उत्पन्न शंभर टक्के आहे .
समजा त्यापैकी 20 टक्के भाग हा उत्पन्न मिळाल्या नंतर लगेच बचत खात्यामध्ये गेला पाहिजे. त्याने काय होईल की 100% पैकी 20% हे आपले प्रत्येक महिन्याला बचत होईल.
त्यानंतर त्यामध्ये 50 टक्के भाग हा गरजाच्या खर्चासाठी वापरा उदाहरणार्थ खर्चामध्ये अन्न, वस्त्र, निवारा म्हणजेच तुमचा घर भाडे असेल , तुमचा महिन्याचा किराणाचा खर्च असेल, किंवा तुम्हाला कपडेल ते काही घ्यायचं असतील.
मुलांच्या फीस असतील, मुलांचा युनिफॉर्म असतील, खूप साऱ्या गरजाच्या वस्तू आहेत. त्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा 50 टक्के भाग हा दर महिन्याला गरजा वस्तूंसाठी वापरायला. 30 टक्के भाग हा सगळ्यांसाठी आनंदाचा भाग आहे त्यामध्ये तुमची हाऊस मोज करा.
म्हणजे सर्वांना असं वाटतं की आपण जगायचं कधी, जर पूर्ण पगार बचत करायची. पूर्ण पगार खर्च करायचा नाही. पूर्ण आपला पगार हा गरजांसाठीच वापरायचा. तर आपण जगणार कधी आपण हाऊस करणार कधी.
तर आपण हाऊस मोजण्यासाठी आपल्या पगारीतला आपल्या उत्पन्नातला 30 टक्के भाग हा वापरावा जेणेकरून आपली बचत होईल आपल्या घरचे सामान पण होईल. आणि आपला एन्जॉयमेंट पन होईल.अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचं पैसे वाचतील पण आणि वायफाय खर्चही नाही होणार.
पगारातून किती पैसे वाचवायचे??
पगारामधून तुम्ही किती पैसे वाचायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर तुम्ही पगारामधून जितकी जास्त होईल तितके पैसे वाचू शकता.
परंतु प्रत्येक महिन्यामध्ये पगारामधून भरपूर पैसे वाचवणे शक्य नसते. कारण प्रत्येक महिन्यात खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्यामध्ये आपला पगार लगेच संपून जातो. पण आपण जर पगाराच्या नियोजन केलं तर आपण दर महिन्याला पैसे वाचू शकतो.
म्हणजे आपल्या पगारापैकी 20 टक्के भाग हा बचत केला 50 टक्के भागांमध्ये गरजेच्या वस्तू घेतल्या व 30 टक्के भाग हा तुमच्या एन्जॉयमेंट साठी वापरला तर प्रत्येक महिन्याला पगाराच्या वीस टक्के भाग हा बचत होऊ शकतो.
वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत मी किती पैसे वाचवले पाहिजेत??
वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत म्हणजे तुमच्या सेवानिवृत्तीपर्यंत तुम्ही किती बचत केली पाहिजे. हा सामान्य प्रश्न आहे ह्या सामान्य प्रश्नाचा नियम असा आहे,
की तुमच्या घरचा उत्पन्नाच्या तिप्पट तुमची बचत झाली पाहिजे. जर तुम्ही विवाहात असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत मिळून या बचतीचं नियोजन करू शकता. त्यामुळे दोघांचे मिळून भरपूर बचत होईल.
महिन्याला किती पैसा मी गुंतवावा??
महिन्याला माझा किती पैसा मी गुंतवावा वरच्या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगितला आहे. की पैसा किती वाचवावा किंवा किती बचत करा. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा 20% भाग बचत करत असाल.
तर वर्षाखेरीस तुम्ही पंधरा ते वीस टक्के भाग हा बचत करू शकता वर्षात दहा ते पंधरा टक्के बचत करण्याचा सल्ला हे आर्थिक नियोजन करणारे तुम्हाला देतात.
प्रत्येक महिन्याला जास्तीत जास्त बचत हे उद्दिष्ट तुम्हाला उत्पादनाच्या 15 ते 20 टक्के इतक्या असते जी त्या उत्पादनाचा पातळीसाठी योग्य रक्कम असते.
शंभर टक्के पैकी 40% कसे काढावे?
टक्केवारी कशी काढावी तुमच्या पगारी मध्ये 40 टक्के, 20 टक्के हे कसे काढावे हे काढण्यासाठी खूप लोकांना अडचणी येतात यासाठी सोपा नियम आहे.
म्हणजे जर तुमच्या उत्पन्नाचा 40% भाग तुम्हाला काढायचा असेल तर तुमच्या उत्पन्नातला ४० नी गुणाकार करावा लागेल व शंभर नी भागाकार करा. त्याबरोबर तुमचा ४० टक्के भाग येईल
उदाहरणार्थ तुमचे उत्पन्न हे पन्नास हजार महिन्याला आहे तर त्याचे 40 टक्के किती??
(४०*५००००)/१००= २००००
तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे 20 टक्के 40, 50, 60, 70 असे टक्केवारी सहज शोधू शकता. यासाठी टक्केवारी गुणले उत्पादनाला 100 भागिले असे कर. यांनी तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे टक्केवारी मिळेल.