कमी व्याजदरामध्ये होम लोन कसे मिळवायचे How to get Home Loan in Minimum Rate Of Interest
होम लोन कमी व्याजदरामध्ये कसे मिळवायचे, होम लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरावी, होम लोन कोणत्या बँकेकडून घ्यावे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळतील तर तुम्ही हे आर्टिकल पूर्ण वाचा.
आपले स्वतःचे घर असावा हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. प्रत्येक जण छोटं, मोठं, बंगला, फ्लॅट असं कुठल्याही पद्धतीचा आपल्या मालकीचा आपलं घर असावा याचे स्वप्न बघतात. मुळात अन्न, वस्त्र, निवारा या तीन आपल्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये निवारा ही आपली मूलभूत गरज आहे.
निवारा म्हणजे काय आपल् घर. प्रत्येक जण आपले जीवनामध्ये आपल्या घरासाठी पळतो. मग ते घरातल्यासाठी असेल किंवा मग घर घेण्यासाठी असेल. स्वतःच्या मालकीचे घर हे प्रत्येकाच्या जीवनातलं खूप मोठं स्वप्न असतं.
काही जणांना आपल् घर, स्वप्न वडीला पारित मिळतं, पण काही जणांना ते स्वतः कमाव लागतात जेव्हा आपण स्वतःच्या मालकीचे घर स्वतः घेतो. तेव्हा समजतं की घर बनवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात.
आज-काल मोठमोठ्या शहरांमध्ये स्वतःच्या मालकीचं फ्लॅट घेण्यासाठी सुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागतात. मग हे लाखो रुपये आपल्या जवळ असतात का, मग आपल्याला आपलं घर घ्यायचं आहे पण हे लाख रुपये आणायचे कुठून .
आपले नातेवाईक तर आपल्याला देणार नाहीत आणि नातेवाईकांनी दिले तरी आपल्याला घ्यायचे नाहीत. कारण पाहुण्यांमध्ये किंवा आपल्या मित्र परिवारामध्ये आपल्याला पैसे मागायची वेळ कधीच येऊ नये .
तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल मग हे पैसे येणार तरी कुठून एवढे लाखो रुपये आपल्याला देणार तरी कोण. तर हे पैसे आपल्याला आपली स्वतःचं घर घेण्यासाठी पैसे ही बँक देते.
मग बँक म्हटलं की भरपूर व्याज खूप सारे कागदपत्र आणि खूप सारा वेळ खर्च करावा लागतो मग कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोन आणि कमी व्याजदरामध्ये लोन आपल्याला कोणती बँक देईल.
होम लोन कमी व्याजदरामध्ये कसे मिळवायचे, होम लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरावी, होम लोन कोणत्या बँकेकडून घ्यावे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळतील . चला तर मग जाणून घेऊया कमी व्याज दारावर होम लोन कसे मिळेल.
होम लोन कसे मिळतं How To Get Home Loan
आपल्याला कोणतीही गोष्ट मिळत असेल तर त्या बदल्यात आपल्यालाही खूप साऱ्या गोष्टी द्याव्या लागतात. असेच होम लोन साठी मिळणारे लाख रुपये आपल्याला सहज मिळतील असं नसतं.
यासाठी देखील तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील बँक आपल्याला घर घेण्यासाठी पैसे देताना आपली पूर्ण पडताळणी करते. जेणेकरून बँकला विश्वास होईल की आपण त्यांच्याकडून घेतलेले पैसे व्याजासहित बँक ला परत करू शकतो.
बँक होम लोन साठी आपल्याला किती रक्कम देते हा प्रश्न तर सर्वांनाच पडतो कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रक्कम मिळते. म्हणजे तुम्ही घेणारी प्रॉपर्टी किंवा फ्लॅट, जमिनीच्या 80 टक्के पैसा ही बँक देते.
आणि उरलेला 20 टक्के हे पैसे हे आपल्या जवळ असला पाहिजे. मुळात याचा अर्थ असा होतो की तुम्ही एखादा फ्लॅट घ्यायचा विचार करत आहात. तर त्या फ्लॅटच्या रक्कमेचा 20 टक्के भाग हा तुमच्याकडे असला पाहिजे .
आणि उरलेला 80 टक्के भाग हा बँक तुम्हाला देईल. जर तुमच्याकडे फ्लॅटच्या वीस टक्के रक्कम असेल तर तुम्ही होम लोन साठी अप्लाय करू शकता.
होम लोन मिळवण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला एक प्रॉपर्टी निवडावी लागते. ज्याला तुम्ही विकत घेऊ इच्छिता. ही प्रॉपर्टी फ्लॅट घर किंवा रिकाम्या जमिनीचा तुकडा होऊ शकते.
तुम्हाला आवडलेल्या प्रॉपर्टीची कागदपत्रे ची कॉपी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा व त्या प्रॉपर्टीला पैसे देण्याच्या अगोदर तुम्ही या प्रॉपर्टीचे कागदपत्रे बँक ला एक वेळेस दाखवून बघा.
कारण त्या प्रॉपर्टी वरती तुम्हाला लोन मिळेल का हे बँक कडून तुम्ही खात्री करून घ्या. तुम्ही कागदपत्रे बँक मध्ये चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की बँक तुम्हाला या प्रॉपर्टी वरती लोन देईल की नाही.
लक्षात ठेवा तुम्ही जर होम लोन घेऊन इच्छित असाल तर एक वेळेस नक्की तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेकडून दाखवून घ्या. व खात्री करून घ्या की या कागदपत्रानुसार तुम्हाला होम लोन मिळेल का नाही.
यामुळे तुम्हाला सोपे होईल . प्रत्येक प्रॉपर्टी ही बँक मध्ये रजिस्टर असते जेणेकरून त्यावरती तुम्हाला लोन मिळू शकेल. गव्हर्नमेंट बँक मध्ये जर ती प्रॉपर्टी रजिस्टर नसेल तर तुम्हाला ते प्रायव्हेट बँक मध्ये अप्लाय करावा लागेल. यामुळे प्रत्येक बँक मध्ये तुम्ही ही प्रॉपर्टी खात्री करून घ्या.
होम लोन घेण्यासाठी काय पात्रता असायला हवी : What Is Eligibility criteria for Home Loan:
होम लोन घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती आवश्यक आहेत ज्या खालील प्रमाणे आहेत.
- होम लोन साठी अप्लाय करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे.
- जो व्यक्ती होम लोन साठी अप्लाय करत आहेत. त्याचं वय हे 22 ते 60 च्या दरम्यान असले पाहिजे. काही बँकांमध्ये वयाची आठ ही 75 वर्षापर्यंत देखील आहे.
- तुमच्याकडे नोकरी किंवा कोणत्याही प्रकारचं पैसे कमवण्याचं साधन असलं पाहिजे. याचं प्रमाणपत्र लागेल म्हणजेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पेस्लीप आणि बिझनेस करत असाल तर तुमचा प्रॉफिट स्लीप.
- होम लोन घेणाऱ्या व्यक्तीकडे त्याचा पर्मनंट ऍड्रेस प्रूफ असला पाहिजेत.
कोण कोणते बँक होम लोन देतात. Which Bank Provide Home Loan ?
सरकारी आणि प्रायव्हेट अशा दोन्ही बँके होम लोन देतात. पण होम लोन देत असताना या दोन्ही बँकेचा व्याजदर हा वेगवेगळा असतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या बँकेत होम लोन देतात.
होम लोन देणाऱ्या सरकारी बँके ची नावे :
- एसबीआय बँक SBI Bank
- बँक ऑफ बडोदा Bank Of Baroda
- बँक ऑफ इंडिया Bank Of India
- युनियन बँक ऑफ इंडिया Union Bank Of India
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank Of India
होम लोन देणाऱ्या प्रायव्हेट बँके ची नावे
- एचडीएफसी बँक HDFC Bank
- आय सी आय सी आय बँक ICICI Bank
- कोटक महिंद्रा बँक Kotak Mahindra Bank
- आयडीएफसी बँक IDFC Bank
- येस बँक Yes Bank
सर्वात शेवटी फायनान्स कंपनी येतात ज्या होम लोन देण्यासाठी सर्वात पुढे असतात पण यांचा एक तोटा आहे तो म्हणजे फायनान्स कंपन्या हा होम लोन वरती व्याजदर खूप जास्त घेतात सरकारी बँक अपेक्षा प्रायव्हेट बँका हा व्याजदर जास्त घेतात व प्रायव्हेट बँक अपेक्षा जास्त फायनान्स कंपन्या घेतात.
होम लोन देणाऱ्या फायनान्स कंपन्यांची बँके ची नावे
फायनान्स कंपन्या ह्या बिझनेस लोन सुद्धा देतात बजाज हाऊसिंग फायनान्स
- ॲक्सिस फायनान्स बँक Axis Bank
- टाटा कॅपिटल TATA Capital
- आदित्य बिर्ला कॅपिटल Aditya Birla Capital
- लेंडिंग कार्ड lending kart
होम लोन चा व्याजदर किती असतो : Home Loan Interest rate
होम लोन चा व्याजदर हा वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या असतो. सर्वसाधारणपणे सगळ्या बँकेमध्ये हा व्याजदर 6.90% ते 14.5% इतपर्यंत असतं. मग वेगवेगळ्या बँकेमध्ये हा व्याजदर 6.9 पासून ते 14.5 पर्यंत व्हेरी होत राहतो. होम लोनचा व्याजदर हा होम लोन घेणाऱ्याच्या सिबिल स्कोर वरती ठरला जातो.
आणि या सोबतच प्रॉपर्टी च्या कागदपत्रावर सुद्धा निर्भर असतो. सरकारी बँकेमध्ये होम लोन चा व्याजदर हा कमी प्रमाणात असतो. तसेच प्रायव्हेट बँकेमध्ये हा होम लोनचा व्याजदर थोडा जास्त असतो. परंतु फायनान्स कंपन्यांमध्ये व्याजदर हा खूप जास्त प्रमाणात असतो.
तुम्ही जे विकत घेणारे प्रॉपर्टी आहे ती जर सरकारी बँकेमध्ये रजिस्टर असेल, म्हणजेच प्रॉपर्टी NA तर तुम्हाला सरकारी बँकेमध्ये लोन मिळण्यास सोपे होते. आणि व्याजदर सुद्धा कमी असतो .
अन्यथा तुम्हाला तुम्ही निवडलेल्या प्रॉपर्टीला प्रायव्हेट बँकेमध्ये तपासून पहावे लागेल. त्यावरती होम लोन मिळते का जर प्रायव्हेट बँकेमध्ये मिळत असेल तर त्याचा व्याजदर हा सरकारी बँकेच्या व्याजदरापेक्षा थोडा जास्त असेल.
सगळ्यात स्वस्त होम लोन कोणती बँक देते : Which Bank Provide Low Rate Of Interest :
होम लोन मध्ये व्याजदराचा खूप महत्त्व आहे. कारण आपण होम लोन हे लॉंग टर्न लोन म्हणून घेतो. म्हणजे होम लोन घेण्यासाठी कालावधी हा वीस वर्ष ते पंचवीस वर्षाचा असतो..
होम लोन हे लॉन्ग टर्म लोन असल्यामुळे याचा व्याजदराचा खूप फरक पडतो. कारण वर्षानुवर्ष हे आपण घेतलेल्या लोण पेक्षा जास्त आपण व्याज बँकेला परत देतो. त्यामुळे कमीत कमी वेळेसाठी होम लोन घेतलेले कधीही चांगले.
पण जर 25 ते 30 वर्षासाठी पण कमी व्याज दारात आपल्याला होम लोन भेटले. तर तेही चांगले. आपले थोडे पैसे वाचतील त्यामुळे कधीही होम लोन घेते वेळेस कमी व्याजदर कोणती बँक देत आहे हे अभ्यास करूनच आपण होम लोन घ्यावे.
सगळ्यात कमी व्याजदरावर होम लोन देणाऱ्या बँका खालील प्रमाणे
बँक ऑफ महाराष्ट्र Bank Of Maharashtra
बँक ऑफ महाराष्ट्र ही अशी बँक आहे ही होम लोन वरती कमी टक्के व्याज देते या बँकेमध्ये 6.9% इतके व्याजदर आहे बँक ऑफ महाराष्ट्र ही एक सरकारी बँक आहे. त्यामुळे येथील व्याजदर हे कमी आहे.
ही बँक तुम्हाला 75 लाख पर्यंत होम लोन देऊ शकते परंतु हे लोन पास करण्यासाठी तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आणि तुमचा वार्षिक उत्पन्न हे पाहिलं जातं. तुमच्या वार्षिक उत्पन्नावर आणि तुमच्या प्रॉपर्टीच्या किमतीवर तुमचं लोन ठरलं जातं
एसबीआय बँक SBI Bank
एसबीआय बँक SBI Bank ही दुसऱ्या क्रमांकावर सर्वात कमी व्याज घेणारी बँक म्हणून ओळखले जाते. या बँकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोन तुम्हाला मिळून जाते एसबीआय बँक सुद्धा सरकारी बँक आहे.
ही बँक तुम्हाला कमीत कमी 30 वर्षापर्यंत लोन देते. तीस वर्षापर्यंत लोन घेण्यासाठी तुमचे वय हे आता 30 असले पाहिजे आणि या बँकेमध्ये 8.5 इतका व्याजदर तुम्हाला होम लोन वरती लागेल.
सरकारी बँकेतून होम लोन घेतल्याने फायदे : Benefits Of Government Bank Home Loan :
- सरकारी बँकेतून लोन घेतल्यानंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे, सरकारी बँकेचे व्याजदर हे कमी असतात. त्यामुळे खूप जास्त Time साठी लोन घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला कमी व्याज बँकेला परत करावे लागते.
- सरकारी बँकेमध्ये तुम्हाला तीस वर्षासाठी लोन दिले जाते. तीस वर्षे ही होम लोन मध्ये सगळ्यात जास्त अवधी आहे. तीस वर्षापर्यंत लोन घेण्यासाठी तुमचं वय वर्तमान मध्ये तीस वर्षे असले पाहिजे. म्हणजे सरकारी बँकेच्या अटीनुसार तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत लोन भेटता येईल.
- सरकारी बँकेमध्ये होम लोन घेण्याची प्रोसेसिंग फी ही इतर बँकेपेक्षा कमी असते.
- सरकारी बँकेमध्ये तुम्हाला तुमच्या लोन चा कालावधीच्या आधी जर लोन बंद करायचा असेल, म्हणजेच जर तुमच्याकडे कुठून एवढे पैसे आले जेणेकरून तुमचं होम लोन हे बंद होईल.
- सरकारी बँकेमध्ये तुमच्याकडून हे लोन बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतला जात नाही. परंतु या उलट प्रायव्हेट बँकांमध्ये काही ना काही कारण सांगून तुम्हाला चार्जेस पे करावे लागतात.
- बहुतांश वेळास हे चार्जेस तुमच्या रकमेच्या 5 टक्के सुद्धा असतात. त्यामुळे तुम्हाला लोन बंद करत असताना काही प्रमाणात चार्जेस पे करावे लागतात.
घर बांधण्यासाठी होम लोन मिळू शकतो का?? Can you get Home loan for Built house?
हो, घर बांधण्यासाठी होम लोन मिळू शकतात, परंतु यासाठी काही अटी आहे .जर तुम्ही प्रथम जमीन घेऊन ठेवली असेल आणि त्यावरती तुम्हाला घर बांधायचा असेल तर तुम्हाला यासाठी होम लोन जरूर भेटेल हे होम लोन तुम्हाला कमीत कमी व्याजदरावरती मिळेल.
यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, पेमेंट रिसिप्ट, बँक स्टेटमेंट जमिनीचे कागदपत्र हे सर्व कागदपत्रे तुम्ही फोटोकॉपी करून एखाद्या बँकेला किंवा फायनान्स कंपनीला संपर्क करा तुम्हाला किती लोन मिळेल हे तुमच्या वार्षिक उत्पन्नावर निर्भर असेल घर बांधण्यासाठी लोन हे तीन ते चार टप्प्यांमध्ये मिळतं.
होम लोन घेण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात? What Document are Recurment for get Home Loan?
होम लोन घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक असते. या कागदपत्रावरून तुम्हाला समजेल की तुम्हाला किती लोन मंजूर होईल तर होम लोन घेण्यासाठी कागदपत्रे
जर तुम्ही नोकरी करत असाल तर यासाठी कागदपत्रे:
पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल पावती, तुमची सॅलरी स्लिप चालू तीन कंपनीमधील अपॉइंटमेंट लेटर, बँक स्टेटमेंट चालू सहा महिन्याचं जमीन किंवा फ्लॅटचे कागदपत्रे.
जर तुम्ही व्यापार करत असाल तर तुमच्यासाठी लागणारे कागदपत्रे:
पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल पावती जिथे तुम्ही राहत असाल इन्कम टॅक्स रिटर्न चालू तीन वर्षाचा बँक स्टेटमेंट तुमच्या करंट खात्यातील चालू सहा महिन्याचं स्टेटमेंट जमीन चे कागदपत्रे आणि बँकेतील आवश्यकता असल्यानुसार कागदपत्रे.