How to investment in share market शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी ? शेअर्स म्हणजे काय ?
बहुतांश वेळा खूप लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून , आपल्या गुंतवणुकीचा नफा मिळवायचा असतो. परंतु शेअर मार्केट(Share Market) बद्दल बहुतांश माहिती नसल्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी अडचणी निर्माण होतात.
आज आपण या आर्टिकल मध्ये शेअर म्हणजे काय? हे बेसिक पासून बघणार आहोत . जेणेकरून तुमच्या मनातील शेअर मार्केट बद्दलची सर्व संकल्पना क्लिअर होईल.
शेअर मध्ये कसं गुंतवणूक करायचं ,नेमकं शेअर्स म्हणजे काय , किंवा स्टॉक म्हणजे काय , स्टॉक मार्केटिंग म्हणजे काय, अजून आपल्याला शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर किती नफा मिळेल अशा बऱ्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या छोट्याशा आर्टिकल मध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे
शेअर म्हणजे काय?? (What is Share?)
तुम्ही जर युट्युब ,गुगल (You Tube, Google) अशा कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती सर्च केलं. शेअर म्हणजे काय? शेअर्स वर गुंतवणूक कशी करायची .
तर तुम्हाला बरेचशे उत्तर मिळतील. परंतु ते समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी येतील. म्हणून मी तुम्हाला या पोस्टमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये शेअर्स काय असत हे सांगेल.
शेअर्स म्हणजे काय ? हे सांगण्या आधी तुम्हाला एक उदाहरण सांगते . उदाहरणांमध्ये तुम्ही समजून घ्या की चार लहान मुले आहेत .आणि ते दुकानात गेली .
आणि त्यांना चॉकलेट पाहिजेत .परंतु चॉकलेटचा डब्बा विकत घेण्यासाठी त्यांचा एका कडे पुरेसे पैसे नाहीयेत. म्हणजे समजून घ्या एक चॉकलेटचा डब्बा दोनशे रुपयाला आहे. आणि हे चार मित्र आहेत .
परंतु एकाकडेही दोनशे रुपये नाहीयेत. प्रत्येक जणांकडे 50-50 रुपये आहेत. तर ते 4 मिळून हा चॉकलेटचा डब्बा विकत घेऊ शकतात .जर हा चॉकलेटचा डब्बा चार मित्रांनी मिळून विकत घेतला.
तर हा चॉकलेटचा डबा नेमका कोणाचा, ज्यांनी विकत घेतला त्याचा, नाही हा चॉकलेटचा डब्बा त्यात चौघांचा समान झाला .कारण त्यावर या चौघाचा समान अधिकार झाला .
यालाच आपण एक चतुर्थांश मालकी हक्क, किंवा एक चतुर्थांश भाग ,किंवा एक चतुर्थांश शेअर म्हणू शकतो. याच गोष्टीला इंग्लिश मध्ये आपण share in the ownership असं बोलतो.
आता वरी दिलेलं उदाहरण जर तुम्ही मोठ्या कंपनीला लावून पाहिलं .तर तुम्हाला समजत उदाहरणार्थ मोठी रिलायन्स कंपनी आहे . त्यामध्ये आपण एक शेअर होल्डर आहोत. तर आपला हिस्सा एक शेअर पुरता आहे.
जसा वरच्या उदाहरणांमध्ये एका कंपनीसाठी फक्त चार लोकांनी इन्वेस्ट केलं होतं. त्यामुळे त्यांनी 25%, 25% चे शेअर होल्डर झाले .परंतु मोठ्या कंपन्यांमध्ये असे लाखो लोक इन्वेस्ट करतात.
त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स लाख मध्ये असतात. त्यामुळे आपण जर एक शेअर्स विकत घेतला तर आपण त्या कंपनीमध्ये एका शेअर होल्डर असतो.
आता तुम्हाला समजून आलं असेलच की शेअर्स म्हणजे काय ,एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून त्या कंपनीचा नफ्यावर आपल्या गुंतवणुकीचा नफा ठरतो.
शेअर्स , स्टॉक हे दोन्ही शब्द समान आहेत. हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आलट पालट करू शकता .याला तुम्ही शेअर होल्डर, स्टॉक होल्डर , स्टॉक मार्केट ,शेअर मार्केट असं तुमच्या सोयीनुसार बोलू शकता .
मुळात एवढंच की शेअर्स किंवा स्टॉक म्हणजे काय हे तुम्हाला समजले असेल. यापुढे आपण जाणून घेऊया स्टॉक एक्सचेंज (Stock Exchange ) म्हणजे काय किंवा शेअर एक्सचेंज (Share Exchange ) म्हणजे काय.
स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?? (What Is Stock Exchange)
स्टॉक एक्सचेंज बद्दल तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. मी या पोस्टमध्ये तुम्हाला सर्व काही उदाहरण देऊन सांगत आहे .
कारण छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये आपल्या मोठ्या मोठ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. असा आपण जाणून घ्यायला गेलं शेअर, स्टॉक बद्दल तर खूप डिफिकल्ट भाषेमध्ये ,खूप अवघड भाषांमध्ये लिहिलेलं असतं .
ज्यामध्ये आपण गोंधळून जातो. त्यामुळे आपल्या लहानपणाच्या किंवा आपल्या रिलेटेड ,आपल्या सभोवतीच्या काही उदाहरणांमुळे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी खूप सहजपणे क्लिअर होतात.
चला तर मग जाणून घेऊया स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय .उदाहरणार्थ आपण एखाद्या मंडईमध्ये जातो भाजीपाला आणण्यासाठी किंवा कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी.
आपण मंडईमध्ये गेलो की तिथे काय असतं , एक व्यक्ती काहीतरी वस्तू विकत असतो आणि दुसरा व्यक्ती काहीतरी वस्तू विकत घेत असतं .हे डायरेक्ट त्यांचं एक्स्चेंज होतं यामध्ये कुठल्याही प्रकारचा दलाल किंवा ब्रोकरेज नसतात.
वस्तू विक्रेत्याला त्याची वस्तू विकायची असते आणि घेणाऱ्यांना ती वस्तू घ्यायची असते. त्यामुळे लागेल तेवढा त्या वस्तूचा पैसा तो विक्रेत्याला देऊन तो वस्तू घेतो.
अशाप्रकारे कोणतेही ब्रोकरेज शिवाय या वस्तूचं आणि बोलण्याचं एक्सचेंज म्हणजे आदान-प्रदान होतं बरोबर ना.
पण याउलट जेव्हा आपण स्टॉक एक्सचेंज बद्दल बोलतो . तर या ठिकाणी एक स्टॉक विकणार असतो व दुसरा स्टॉक घेणार असतो .
परंतु यांच्या बद्दल मधलं एक्सचेंज हे डायरेक्ट होत नाही . यामध्ये एक दलाल म्हणजेच ब्रोकर लागतो अशा प्रकारे शेअरच एक्सचेंज होतं.
जसं मंडई रजिस्टर असते. तसंच स्टॉक एक्सचेंज सुद्धा रजिस्टर असतात. आता बरसे स्टॉक एक्सचेंजर रजिस्टर आहेत .
परंतु या स्टॉक एक्सचेंज मध्ये दोन मोठे स्टॉक एक्सचेंज आहेत . ते म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay stock exchange ) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National stock exchange).
आता जर जाणून घ्यायचं झालं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे कधी तयार झाले किंवा याचा इतिहास काय , तर मी थोड्या शब्दांमध्ये तेही तुम्हाला सांगेल.
बॉम्बे स्टॉक ची स्थापना 9 जुलै रोजी झाली . सांगायचं तर बॉम्बे स्टॉक ची सुरुवात ही १८५५ साली झाली. जेव्हा बॉम्बे स्टॉक ची सुरुवात झाली.
तेव्हा आत्ताच अशी बॉम्बे स्टॉक ची बिल्डिंग आहे, तशी तेव्हा नव्हती. परंतु १८७५ मध्ये बॉम्बे स्टॉक ला सुरुवात झाली. त्यांनी त्यांची संस्था स्थापन केली.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातलेच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात पहिले एक्सचेंज मार्केट होते. आता तुम्हाला स्टॉक एक्सचेंज बद्दल थोडीफार माहिती मिळालीच असेल.
शेअर्समधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची तरी का किंवा यांनी आपल्याला काय फायदा होईल. नाहीतर गुंतवणूक कशी करायची या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
शेअर मार्केटमध्ये पैसा का गुंतवायचा??
तुम्ही सर्वसाधारणपणे विचारले की शेअर मार्केटमध्ये पैसा का गुंतवायचा , तर पुढून उत्तर हे तुम्हाला एवढेच येईल की आपल्याला पैसा कमवायचा आहे. यासाठी आपण शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा.
हो शेअर मार्केटमध्ये खूप पैसा आहे . पण आपण तो गुंतवत असताना थोडा काळजीपूर्व गुंतवला पाहिजे . कारण त्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे . आपण कोणत्याही क्षेत्रांमध्ये पूर्ण माहिती घेऊनच आपली गुंतवणूक केली पाहिजे.
शेअर मार्केट म्हणजे काय??
खूप लोकांना शेअर्स एक्सचेंज आणि शेअर मार्केट यामध्ये फरक समजून येत नाही. सर्वांना शेअर मार्केट आणि शेअर एक्सचेंज हे एक वाटतं . परंतु शेअर मार्केट आणि शेअर्स हे वेगवेगळी संकल्पना आहे .
शेअर्स एक्सचेंज ही छोट्या अमाऊंटमधील संकल्पना आहे . तर शेअर मार्केट हे तुलनेने थोडी मोठे, व्यापक आहे. यामध्ये अनेक घटक येतात. स्टॉक मार्केटमध्ये अनेक घटक येतात .
त्यापैकी एक घटक म्हणजे स्टॉक एक्सचेंज आहे .तर तुम्हाला समजलेच असेल स्टॉक मार्केट हे किती व्यापक संकल्पना आहे.
आपण स्टॉक मार्केटमध्ये एक घटक स्टॉक एक्सचेंज पाहिला. आता आपण स्टॉक मार्केट मधला दुसरा घटक म्हणजे क्लिअरिंग हाऊस आणि डिमॅट अकाउंट असे दोन घटक जाणून घेणार आहोत.
क्लिअरिंग हाऊस किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन म्हणजे काय??
क्लिअरिंग हाऊस किंवा क्लिअरिंग कॉर्पोरेशन ही संकल्पना जाणून घेण्यासाठी आपण एका छोट्या उदाहरणाच्या मदत घेऊया .
असं सांगायचं गेलं तर क्लिअरिंग हाऊस म्हणजे डिमांड आणि सप्लाय मधील अकाउंट असे बोलले जाऊ शकतात. पण उदाहरणांमध्ये तुम्हाला एकदम क्लिअर होईल की क्लिअरिंग हाऊस म्हणजे काय.
उदाहरणार्थ एक विक्रेता आहे व दुसरा ग्राहक आहे. विक्रेता एखादी वस्तू विकण्यासाठी ग्राहक कडून त्या वस्तूचे मूल्य घेतो . सोबतच ग्राहक सुद्धा वस्तू विकत घेण्यासाठी एखाद्या मूल्य म्हणजेच त्या वस्तूचे मूल्य विक्रेत्याला देतो.
आपण विक्रेत्याकडून एखादी वस्तू घेतली व त्या वस्तूबद्दल आपण त्या वस्तूची पैसे विक्रेत्याला दिले अशा प्रकारे आपल्यामधील विक्रेत्या व ग्राहकांमधील व्यवहार पूर्ण झाला. परंतु स्टॉक मध्ये अशाप्रकारे व्यवहार होत नाहीत.
मग स्टॉक मध्ये व्यवहार होतात तरी कसे, स्टॉक विकले आणि खरेदी कसे केले जातात. स्टॉक मध्ये सुद्धा एक विक्रेता आणि एक ग्राहक असतो .
पण यामध्ये एक ब्रोकर असतं , मग आपण जसं एखादी वस्तू घेण्यासाठी त्या वस्तूचे पैसे देतो तसेच स्टॉक मध्ये कोणत्याही प्रकारचे मूल्य असे दिले जात नाही . तर ते कसे दिले जाते.
शेअर मार्केटमध्ये या पैसे देणे घेण्यासाठी एक क्लिअरिंग कॉर्पोरेशन संस्था असते. किंवा त्याला क्लिअरिंग हाऊस सुद्धा म्हणतात . जसं आपण जाणून घेतलं भारतामध्ये दोन प्रसिद्ध शेअर मार्केट एक्सेंजर आहेत. त्यांचे नाव बॉम्बे एक्सचेंजर आणि नॅशनल एक्सचेंजर आहेत .
या दोन्ही स्टॉक एक्सचेंजर्सच्या जवळ त्यांचे आपापली क्लिअरिंग कॉर्पोरेशन आहेत असं सांगायचं गेलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज जर नॅशनल क्लिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड असं स्वतःचं कॉर्पोरेशन हाऊस आहे.
डिमॅट अकाउंट म्हणजे काय?
यावरून तुम्हाला क्लिअरिंग हाऊस म्हणजे काय, हे समजला असेल ,आता डिमॅट अकाउंट म्हणजे काय.हे जाणून घेऊया.
जसं मी तुम्हाला या आधी उदाहरणात सांगितले होते .की आपण विकत घेतलेली वस्तू सोबत घेऊन फिरतो तसा शेअर मध्ये नसतं . शेअर मार्केटमध्ये शेअर्स कसे ठेवायचे, कुठे ठेवायचे ते काय पिशवीमध्ये घेऊन फिरता येतात का नाही.
त्यामुळे शेअर ठेवण्यासाठी ते अकाउंट असतं त्या अकाउंटला डिमॅट अकाउंट असे बोलतात.
तुम्हाला डिमॅट अकाउंट म्हणजे काय हे समजले असेल. आपण जे आता डिमॅट अकाउंट आणि कॉर्पोरेशन क्लिअरिंग किंवा क्लिअरिंग हाऊस समजून घेतलं. हे दोन्ही घटक शेअर मार्केटचे आहेत. स्टॉक एक्सचेंज नाहीत.
ट्रेडिंग खाते म्हणजे काय??
ट्रेडिंग खाते हे असे खाते आहे . ज्यामध्ये शेअर होल्डर आणि शेअर घेणारा दोघांकडे हे अकाउंट असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही शेअर्स विकत असाल आणि पुढचा व्यक्ती शेअर्स घेत असेल .
तर यामध्ये ब्रोकर असतात . हा ब्रोकर डायरेक्ट शेअर या अकाउंट मधून पुढच्याच्या डिमॅट अकाउंट मध्ये शेअर पाठवत नाहीत. त्यासाठी शेअर पहिलं डिमॅट अकाउंट मधून विक्रेत्याच्या ट्रेडिंग खात्यामध्ये येतात.
त्यानंतर विकत घेणाऱ्याच्या ट्रेडिंग खात्यामध्ये पाठवले जातात . यानंतर विक्रेत्याच्या ट्रेडिंग खात्यामधून विकत घेणाऱ्याच्या डिमॅट अकाउंट मध्ये पाठवले जातात.
म्हणजेच शेअर्स विकणाऱ्या पासून शेअर्स घेणाऱ्याच्या डिमॅट अकाउंट पर्यंत जो रास्ता किंवा पात फॉलो केला जातो. त्यालाच ट्रेडिंग अकाउंट किंवा ट्रेडिंग खाते असे म्हणतात.
विकण्यासाठी किंवा शेअर्स विकत घेण्यासाठी ट्रेडिंग खाते हे गरजेचे असते.
थ्री इन वन खाते म्हणजे काय ?
डिमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट अशा या दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या आहेत. तर थ्री इन वन हे काय आहे . तर शेअर्स विकण्यासाठी आणि शेअर्स खरेदी करण्यासाठी आपल्याकडे थ्री इन वन खाते असणे गरजेचे आहे.
म्हणजे काय! ट्रेडिंग खाते, डिमॅट खाते आणि सेविंग खाते बचत खाते तिनी अकाउंट आपल्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्ही हे तिन्ही खाते एकाच बँक मध्ये काढू शकता.
जसं की डिमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट आणि सेविंग अकाउंट हे तुम्ही तुमच्या एकाच बँक मध्ये तिने काढू शकता. यालाच थ्री इन वन खाते असे म्हणतात. पण तुम्ही हे तिन्ही खाते तुमच्या ब्रोकर कडे काढू शकत नाही.
तुमच्या ब्रोकरकडे तुम्ही डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट काढू शकता परंतु बचत खाते काढण्यासाठी तुम्हाला बँकेमधूनच काढावे लागते.
तुमच्याकडे हे तिन्ही अकाउंट असतील तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आधी तुम्ही हे सर्व अकाउंट काढून तयार राहा .
असं नको व्हायला की तुम्हाला गुंतवणूक करायचे ,आणि तुम्ही त्यावेळेस अकाउंट काढायचा प्रयत्न करता .तर तुम्ही हे सर्व स्टेप आधीच करून घ्या डिमॅट अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन सर्व माहिती मिळून जाईल.
तुम्ही डिमॅट अकाउंट खूप कमी वेळामध्ये काढू शकता डिमॅट अकाउंट काढण्यासाठी नॉर्मल सेविंग अकाउंट काढण्यासारखेच डॉक्युमेंट लागतात .
डिमॅट अकाउंट काढण्यासाठी डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- चेक बुक
- पेन
- एक कोरा पेपर
- एका कोऱ्या पेपर वर आपली साईन
- आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
हे सर्व डॉक्युमेंट जवळ असतील तर तुम्ही डिमॅट अकाउंट हे कमी वेळामध्ये काढू शकता. आशा करते की आज या आर्टिकल मधून तुम्हाला शेअर बद्दल व शेअर मार्केट बद्दल पूर्ण नाही परंतु बेसिक माहिती भेटली असेल जर तुम्हाला शेअर बद्दल अजून काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कळवा.